Manoj Jarange News : मराठा समाजाने वेळ दिला, आता सरकारची कसोटी; आंदोलन संपण्याचा प्रश्नच नाही!

Maratha Reservation News : आज एखादा सर्वमान्य तोडगा निघण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange On Maratha Reservation News
Manoj Jarange On Maratha Reservation News Sarkarnama

Jalna Protest : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकार हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावर जरांगेंनी भाष्य केलं आहे. " आता आंदोलन चिरडणे शक्य नाही. हे आंदोलन जनतेने हातात घेतले आहे. आता हे जनआंदोलन झाले आहे. सरकारला महिनाभराचा वेळ दिला आहे, आता सरकारची कसोटी आहे. आंदोलन संपलेले नाही," असे जरांगे म्हणाले. (Latest Marathi News)

Manoj Jarange On Maratha Reservation News
Maratha Reservation News: मराठा आरक्षणावर शिंदे-फडणवीस-पवार खरंच गंभीर आहेत का? Video Viral; नेमकं काय घडलं...

आपल्या उपोषणावर जरांगे ठाम आहेत. "सरकारने आम्हाला वेळ मागितला होता, आम्ही तो दिला. त्यामुळे आमरण उपोषण मागे घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी "साम"शी बोलताना व्यक्त केली. जरांगेंनी काल (मंगळवारी) सरकारला या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे, पण त्याचवेळी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ उपोषणस्थळी येण्याची अट घालून त्यांची कोंडी केली. या प्रकरणी आज (बुधवारी) एखादा सर्वमान्य तोडगा निघण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठका या सपशेल अपयशी ठरताना पाहायला मिळत आहेत. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. यावर संजय राऊत यांनी "मनोज जरांगे पाटील यांच्याशी अधिकृतपणे चर्चा व्हावी, एजंटच्या माध्यमातून नाही," असा टोला सरकारला लगावला आहे.

सरकारला जरांगेंनी अवधी दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कारण मराठा आरक्षण ही किचकट प्रक्रिया आहे. कायदेशीर, तांत्रिक अशा अनेक प्रक्रियांतून जाऊन, मग निर्णयापर्यंत जावं लागणार सत्य आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Manoj Jarange On Maratha Reservation News
Sachin Ombase News : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आता सनदी अधिकारी; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे उकळले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com