Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगेंची मुंबईच्या दिशेन कूच; असा असेल अंतरवालीपासूनचा मार्ग...

Maratha Reservation : आझाद मैदानावर 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला होणार सुरुवात.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आजपासून 'आर या पार'ची लढाई लढत आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते आमरण उपोषण सुरू करणार आहेत. ते आज (दि. 20 जानेवारी) रोजी सकल मराठा समाजबांधवांना एकत्र घेऊन अंतरवली सराटी ते मुंबई अशा पायी यात्रेने निघणार आहेत.

त्यासाठी आज सकाळपासून अंतरवाली सराटी गावात मराठा समाज बांधव जमा होण्यास सुरू झाले आहेत. मुंबईच्या दिशेने मिळेल ते वाहन घेऊन शांततेने चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्यातील मराठा बांधवांना केले आहे. या अंतरवाली ते मुंबई प्रवासादरम्यानचा मार्ग जरांगे यांनी निश्चित केला असून मुंबईला निघण्यापूर्वी आंदोलनाचे संपूर्ण वेळापत्रक, मुक्कामाची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत.

Manoj Jarange
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : भुजबळांच्या मतदारसंघात मराठा आंदोलकांना नोटीस; नेमकं काय घडलं...

यातून कोणत्या तारखेला नेमके काय करायचे, याची विस्तृत माहिती आज मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. घरी राहू नका ही शेवटची आर - पारची लढाई आहे. मुंबईत ताकदीने या. उपोषणामुळे शरीर मला साथ देत नाही. मात्र तुम्ही एकजूट तुटू देऊ नका, असे अवाहन जरांगे यांनी यावेळी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)  

असा असेल अंतरवाली ते मुंबई प्रवासाचा मार्ग...

दिवस पहिला - 20 जानेवारी : अंतरवाली ते मातोरी.

अंतरवालीतून पायी - वाहन यात्रेला सुरुवात होईल. अंतरवालीतून सकाळी 9 वाजता शुभारंभ होऊन, कोळगाव (ता. गेवराई) येथे दुपारचे जेवण होईल, मातोरी (ता. शिरूर) येथे मुक्काम व जेवण.

दुसरा दिवस - 21 जानेवारी : मातोरी ते करंजी बाराबाभळी.

मातोरीतून सकाळी 8 वाजता निघणार, तनपुरवाईला आणि पाथर्डी येथे दुपारचे जेवण, बाराबाभळी-कारंजी बाट (ता. नगर) येथे मुक्काम / जेवण होईल.

तिसरा दिवस - 22 जानेवारी : बाराबाभळी ते रांजणगाव.

बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता निघणार, सुपा (ता. पारनेर) दुपारी जेवण, रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम/जेवण.

चौथा दिवस - 23 जानेवारी : रांजणगाव ते चंदननगर, खराडी बायपास.

रांजणगावातून सकाळी 8 वाजता, कोरेगाव भीमा येथे दुपारी जेवण, चंदनगर-खराडी बायपास मुक्काम/जेवण होईल.

पाचवा दिवस - 24 जानेवारी : खराडी बायपास ते लोणावळा.

चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता निघणार, तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण, लोणावळा येथे मुक्काम / जेवण.

सहावा दिवस - 25 जानेवारी - : लोणावळा ते वाशी

लोणावळाहून सकाळी 8 वाजता निघणार, पनवेल (ता. नवी मुंबई) येथे दुपारी जेवण, वाशी येथे मुक्काम/जेवण.

सातवा दिवस - 26 जानेवारी : वाशी ते आझाद मैदान-मुंबई

वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून निघणार, आझाद मेदान किंवा शिवाजी पार्क मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार.

आठवा दिवस - 26 जानेवारी : आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार.

दररोज 100 किलोमीटरचा प्रवास...

या पायी यात्रेत लाखोंच्या संख्येने मराठाबांधव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून विविध ठिकाणी सामील होणार आहेत. या यात्रेत मोठ्या संख्येने वाहने आंदोलकांबरोबर असणार आहेत. या पायी यात्रेत सकाळी 12 वाजेपर्यंत चालायचे आहे. त्यानंतर सर्वांनी आपापल्या वाहनांत बसून प्रवास करायचा आहे. या पायी यात्रेदरम्यान दररोज जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.

R...

Manoj Jarange
Gondia : मराठा आरक्षणासोबतच आता ढिवर-ढिमर समाजाचा मुद्दा आला ऐरणीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com