Maratha Vs OBC: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भुजबळ देणार जरांगेंना प्रतिउत्तर; तेजस्वी यादवांनाही निमंत्रण...

Chhagan Bhujbal News: प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार
Maratha Vs OBC
Maratha Vs OBCSarkarnama
Published on
Updated on

Nanded: मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना उत्तर देण्यासाठी आता ओबीसी समाजातर्फे मंत्री छगन भुजबळ यांच्या सभांचे आयोजन केले जात आहे. ओबीसी महामोर्चातर्फे नांदेडमध्ये येत्या सात जानेवारी रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे ओबीसी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. 50 एकराच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या महामेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी महामोर्चाचे समन्वय डॉ. बी. डी.चव्हाण यांनी दिली.

या महामेळाव्यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही आमंत्रण दिले जाणार आहे. या मेळाव्यासाठी ओबीसी महामोर्चा नांदेड तर्फे तयारी केली जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Maratha Vs OBC
Manoj Jarange: भुजबळांनी माझा धसका घेतलाय, सध्या झोपेतही ते बरळतात...

राज्यात आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटला आहे. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामधील शाब्दीक युद्ध आपण पाहात आहोत. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या चौथ्या टप्यातील सभांमधून जरांगे प्रत्येक सभेतून भुजबळांवर निशाणा साधत आहेत. त्याला नांदेडच्या सभेतून भुजबळ काय उत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

"मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ नये, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा त्यांचा डाव आहे. म्हणूनच गैरसमज पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही राजकीय मंडळी करीत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगे यांनी केला. "आरक्षण मिळावे म्हणून सर्व समाज पाठीशी आहे.एकवेळ आरक्षण मिळू द्या किती दम आहे ते बघतोच," असा इशारा त्यांनी भुजबळांना दिला. "छगन भुजबळांनी माझा धसका घेतला आहे, सध्या झोपेतही बरळतात,"असे ते म्हणाले.

"मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेले आंदोलन ८० टक्के यशस्वी झाले असून ३५ लाख कुणबी नोंदीवरून पावणेदोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहेच, येत्या २४ डिसेंबरला ऐतिहासिक कायदा होईल," असा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांनी निलंगा येथील जाहीर सभेत काल (शनिवारी) व्यक्त केला. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समाजाशी दगाफटका करून वेळ मारली तर पुढची वेळ तुम्हाला जड जाईल," असा इशाराही जरांगेंनी दिला.

Maratha Vs OBC
Manoj Jarange: जरांगेंनी भुजबळांना करून दिली जेलवारीची आठवण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com