Manoj Jarange Patil : नारायण गडावर जरांगे पाटलांचा मराठ्यांना धडाकेबाज संदेश! म्हणाले, 'मराठ्यांनी आता...'

Manoj Jarange Patil Dasara rally : गुरूवार (ता.2) दसरा विजयादशनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात पाच मेळावे होत आहेत. ज्यात बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही एक आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीडच्या नारायण गडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा भव्य उत्साहात पार पडला.

  2. मेळाव्यात मराठा समाजाला "डोकं लावा, शासक व प्रशासक बना" असा जाज्वल्य संदेश दिला गेला.

  3. मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवा उत्साह आणि दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.

Beed News : बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी राजकीय टिका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी महत्वाच्या मागण्या महायुतीच्या समोर ठेवल्या असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दिवाळीपर्यंत झालीच पाहिजे असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो उपस्थित मराठा बांधवांना महत्वाचा सल्ला दिला. त्यांनी मराठा समाजाला आयुष्यभर लक्षात राहिल असा मंत्र देताना आता बस करा याच्या त्याच्या मागे फिरणे आणि शासक बना, प्रशासक बना म्हणजे कोणीही दादा असो वा राजकीय नेता तो तुमच्या समोर हात बांधून उभा राहिल असे म्हटलं आहे.

मराठ्यानों हुशारीने चला. खाताना विचार करा. गरम की गार झालंय. समाज डुबेल असं वागू नका. मराठ्यांनो चतूर व्हा, बावचळल्यासारखं वागू नका. ‘आम्ही डावं टाकून सर्वांच्या मुंडक्यावर पाय टाकला आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवला. पण आता महत्वाचा मुद्दा आहे की माझा विचार जपून ठेवायचा असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे.

मराठ्यांनो आता डोकं लावून हुशारीने शासक बना आणि प्रशासक बना. शासक बनला तर कुणाला घाबरायची गरज नाही, कोणाकडे मागायची गरज नाही. शेतात काम करता करता, व्यवसाय करा. व्यवसाय करता करता नोकऱ्या करा. आता हुशारीने शासन व्हा.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : विखे पाटलांचा फोन, पण जरांगेंचा प्लॅन ठरला; नारायणगडावरून केली मोठी घोषणा...

डोक्यात राहू द्या प्रशासक बना. तुमच्यावर लागलेला दारिद्र्याचा गंज काढायचा असेल तर शासक बना. कुणी चहा दिला, हात दिला किंवा डोक्यावरून हात फिरवला म्हणून आपण मोठं होणार नाही. आपले प्रश्न सुटणार नाहीत, जातीच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला शासक व्हावं लागेल आणि प्रशासकही बनावं लागेल.

एखादं काम असेल तर शासनाकडे प्रशासनाकडे हात जोडून उभ राहावं लागतं. मग तो राजकीय नेता असो किंवा गुंड असो. त्यामुळे तुम्ही, पीएसआय बना. प्रशासन बना. कलेक्टर, एसपी, पीएसआय बना. तसे केलात तर कोणताही दादा तुमच्यासमोर हात जोडून उभा राहिल. कोणताही नेता तुमच्या समोर हात जोडून उभा राहील. समजून घ्या. कष्ट करा आणि एवढंच पळा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला संदेश दिला आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : विखे पाटलांचा फोन, पण जरांगेंचा प्लॅन ठरला; नारायणगडावरून केली मोठी घोषणा...

FAQs :

प्र.१: दसरा मेळावा कुठे झाला?
उ: बीड जिल्ह्यातील नारायण गडावर हा मेळावा झाला.

प्र.२: हा मेळावा कोणी आयोजित केला होता?
उ: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाला.

प्र.३: जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कोणता संदेश दिला?
उ: त्यांनी मराठ्यांनी हुशारीने शासक आणि प्रशासक बनावे असा संदेश दिला.

प्र.४: या मेळाव्याचा उद्देश काय होता?
उ: मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी समाजाची एकजूट आणि दिशा ठरवणे हा उद्देश होता.

प्र.५: या मेळाव्याचा मराठा आंदोलनावर काय परिणाम होणार?
उ: समाजात नवा उत्साह निर्माण होईल आणि आंदोलनाला अधिक ताकद मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com