Ajit Pawar News : मंत्री व्हायला निघाला.. आरं तू आमदारच कसा होतो तेच बघतो; अजितदादांचा अशोक पवारांना दम

Ashok Chavan : मंत्रिमंडळात दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला. त्यावेळी त्यांची सटकली. वळसे पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होते. आता आपले काही जमणार नाही
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात ते करून दाखवतात. यापूर्वी 2019 मध्ये त्यांनी माजी मंत्री विजय शिवतारेंना तू आमदार कसा होतो, तेच पाहतो, असे म्हणत फिल्डिंग लावली. त्यानंतर पुरंदरमधून शिवतारेंचा पराभव झाला. ऐन लोकसभेत शिवतारेंनी हे प्रकरण तापवले. आता ते प्रकरण शांत होत नाही तोच अजितदादांनी शिरूरचे आमदार अशोक पवारांना दम भरला आहे. मंत्रिपदाची स्वप्न पाहणारे आमदार कसा होतो, असा इशाराच अशोक पवारांना दिला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या Shivajirao Adhalrao Patil प्रचारार्थ शिरूरमध्ये अजितदादांची सभा झाली. यावेळी त्यांनी अशोक पवारांचा समाचार घेतला. ते म्हणाले भाजपसोबत गेल्यानंतर मंत्रिमंडळात दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला. त्यावेळी त्यांची सटकली. वळसे पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होते. आता आपले काही जमणार नाही, असे त्यांनी शेजारच्या आमदारांना त्यांनी सांगितले. हे मला समजले. त्यानंतर ते तिकडे गेले. आता त्यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले आहे. मंत्री होण्यासाठी त्यांनी कारखान्याची वाट लावली, असा थेट आरोप अजित पवारांनी केला आहे.

मंत्री व्हायला निघाला आहात, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो. मी जे म्हणतो ते करूनच दाखवतो. तुझी औकात काय आहे ? असे थेट आव्हानच उपमुख्यमंत्री पवार यांनी अशोक पवारांना Ashok Pawar दिले दिले आहे. अशोक पवारांना कारखाना चालवता येत नाही आणि आमच्यावर पावत्या फाडतो. आता घोडगंगा कारखाना अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढता येऊ शकतो, मात्र संचालक मंडळ एकत्रित हवे. यावेळी अजितदादांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंवरही निशाणा साधला. अमोल कोल्हे सेलिब्रेटी आहेत. पाच वर्षांत ते लोकांकडे गेले नाहीत, अशी टीका केली.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : अरे बापरे! पवारसाहेब उदार मनाचे...; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला

दरम्यान, अजित पवारांनी Ajit Pawar शिवतारेंना दिलेल्या दमाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. ऐन लोकसभेत शिवतारेंनी हे प्रकरण उचलून धरले. अजित पवारांनी पुरंदरच्या लोकांचा अपमान केल्याचा आरोप करत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांत करत शिवतारेंचे बंड शांत केले होते. आता अजितदादांनी विरोधी गटात गेलेल्या अशोक पवारांचे आमदार होण्याचे स्वप्न धुळीला मिळवण्याचे ठाणले आहे. आता शिरूर विधानसभेत काय होणार, याची चर्चा सुरू झाली.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Jalna Politics : 'स्वाभिमानी'ने पाठिंबा देताच कल्याण काळेंचा शेतकऱ्यांना मोठा शब्द; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com