Manoj Jarange Patil News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्य राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. मुंडें यांच्या अडचणी संपत नसतानाच मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की,'कर्ताकरविता हा ( धनंजय मुंडे) आहे. त्याच्यामुळे याच्यावर चौकशी लावली आहे. एसआयटी, सीआयडी, ईडी यांनी याच्या मोबाईलचा सीडीआर काढावा. हा त्याच्या मोबाईलसह ड्रायव्हरच्या, मित्राच्या फोनवरून बोलत असणार त्याचा सीआडीआर काढा. हा खूनामध्ये असणारच. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कितीही मंत्री असून द्या हा आतमध्ये जाऊद्या.'
धनंजय मुंडे यांनी बाहेर राहून पुरावे नष्ट केले तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार असतील, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे हे खंडणी मागणारे नाहीत, अशी पाठराखण भगवनगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केली होती. त्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी नामदेव शास्त्रींची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे त्यांना दिले होते. त्यावेळी बोलताना आपण खुनाचे समर्थन केले नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते.
धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. मुंडे म्हणाले की, शांत बसलोय असे समजू नका.डीबीटीमध्ये काय असावे आणि काय नसावे, याचे संपूर्ण अधिकार कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आहेत. भ्रष्टाचार झालेला नाही. मागील 56 दिवसांपासून मिडिया ट्रायल सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.