Ashok Chavan News : विदेशात डांबून ठेवलेल्या किंवा बेपत्ता भारतीयांची मुक्तता करा! अशोक चव्हाणांची मागणी

Ashok Chavan demands the government to secure the release of Indian nationals who are either locked abroad or missing, addressing the issue in the Rajya Sabha. : अशा चुकीच्या पद्धतीने विदेशात डांबून ठेवलेल्या नागरिकांच्या भवितव्याच्या चिंतेने भारतात त्यांचे कुटूंब प्रचंड तणावात येते, त्यांच्यावर अतिशय कठीण काळ ओढवतो.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Parliament Session News : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी विदेशात उद्योग, व्यवसाय, नोकरी निमित्त गेलेल्या भारतीय नागरिकांना होणारा त्रास, त्यांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्याच्या प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अशा सर्व भारतीयांची मुक्तता सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी राज्यसभेत केली. नांदेडमध्ये वास्तव्यास असलेले अभियंते पांचाळ हे इराणमध्ये पाच डिसेंबर पासून बेपत्ता असल्याचेही चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

संसदीय अधिवेशनात राज्यसभेत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एका वेगळ्याच विषयाला हात घातला. उद्योग-व्यवसायासाठी प्रवास करणारे काही भारतीय नागरिक विदेशात बेपत्ता झाल्याचे चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नांमुळे देशात स्वयंरोजगार, लघु व मध्यम उद्योग, तसेच स्टार्टअप व्यवसाय वेगाने वाढले आहेत.

व्यावसायिक कारणांसाठी अधिकाधिक लोक विदेशात, विशेषतः मध्य पूर्वेतील इराण, कतार, युएई आणि सौदी अरेबियात प्रवास करू लागले आहेत. (BJP) मात्र या देशांमध्ये भारतीय नागरिकांना तेथील यंत्रणांकडून कोणतेही सबळ कारण न देता बेकायदेशीपणे ताब्यात घेण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये राजनैतिक प्रोटोकॉलचे उल्लंघन होते आहे.

Ashok Chavan News
Parliament Session Live Update : तुम्हाला टेबल तोडण्यासाठी पाठवले आहे का? लोकसभेत गदारोळ, अध्यक्ष संतापले...

ताब्यात घेतलेल्या नागरिकांची माहिती तेथील भारतीय दूतावासांना दिली जात नाही. अशा चुकीच्या पद्धतीने विदेशात डांबून ठेवलेल्या नागरिकांच्या भवितव्याच्या चिंतेने भारतात त्यांचे कुटूंब प्रचंड तणावात येते, त्यांच्यावर अतिशय कठीण काळ ओढवतो. त्यामुळे विदेशात अकारण ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

Ashok Chavan News
Pratap Patil Chikhlikar On Ashok Chavan : अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकरही मैदानात, म्हणाले स्वबळाची खुमखुमी असेल तर..

मूळ हिंगोली जिल्ह्यातील मात्र आता नांदेड शहरात वास्तव्यास असलेले अभियंते योगेश पांचाळ डिसेंबरपासून इराणमध्ये बेपत्ता असल्याचेही अशोक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सरकार तातडीने योग्य ती कार्यवाही करेल आणि विदेशातील भारतीयांना सुखरूप देशात परत आणेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com