Jalna News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जरांगे त्यांच्या गावी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण राज्य सरकार घेत असल्याची टीका जरांगे यांनी केली. आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, 'आता थोडी फजिती झाली हीच भूमिका ठेवल्यास विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल' असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा (Maratha) समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला आहे. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार राज्य सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठीच आम्ही जीव जाळतोय, असे जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारने आम्हाला दिलेला शब्द पाळून आरक्षण द्यावं. पण आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज कुणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, यावर बोलताना जरांगे म्हणाले की, आम्हाला राजकारण करायचं नाही आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय, त्यामुळे यामध्ये सरकारने योग्य ती भूमिका घेत कार्यवाही करावी. मराठा समजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या काळातच राज्य सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नंतर नको, सरकारला आमचा रोष परवडणारा नाही.
मराठा समाजाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा राज्य सरकारकडून राहिल, असे स्पष्ट करतानाच मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काय फजिती होते. हे लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. त्यामुळे यावर लवकर निर्णय घ्यावा,आता थोडी झाली विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल, असा इशाराही जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.