Manoj Jarange Hunger Strike : जरांगेंची आर-पारची लढाई; पाणी नाही, उपचार नाही अन् सलाइनही लावणार नाही...

Manoj Jarange Patil Hunger Strike : पुन्हा एकदा जालनातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करत, सरकारला आव्हान...
Manoj Jarange Hunger Strike
Manoj Jarange Hunger Strike Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंची बाजू घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून, मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली.

त्यानंतरही जरांगे आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम राहिले. आजपासून ते पुन्हा एकदा जालनातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करत, सरकारला आर या पारची लढाईचे आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Hunger Strike
Ajit Pawar News : " आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या..." ; बारामतीतील अजितदादांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

जरांगे पाटील म्हणाले, "सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत आज संपली आहे. आज एक ४१ वा दिवस आहे. या दिलेल्या मुदतीत सरकारकडून आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा आंदोलन करत आहे.

आजपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात करत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आजही ही आग्रही मागणी आहे. आताच्या उपोषणात अन्न-पाणी घेणार नाही. सलाइन लावणार नाही, कोणतेही उपचार घेणार नाही, समाजाला न्या. मिळेपर्यंत माझा लढा सुरू राहील, असे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Hunger Strike
Manoj Jarange Patil Hunger Strike : पवारांचा पाठिंबा, ठाकरेंचे कौतुक, शिंदेंची शपथ... तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम!

पहिल्या टप्प्यातील उपोषण स्थागित झाल्यानंतर आणि ४० दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे आता नव्याने ॲक्शन मोडवर आले आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत शांत राहून २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा जरांगेंनी इरादा जाहीर केला आहे.

मराठ्यांच्या आंदोलनांची व्यापकता जाणून आरक्षणाला पाठिंबा देण्याची स्पर्धा राजकीय पक्षांत लागली आहे. मात्र, सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याचे जाहीर करत जरांगेंनी सरकारला आव्हान दिले आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com