Assembaly Election: चर्चा तर होणारच..! सलग 72 वर्षांपासून 'या' मतदारसंघात एकाच कुटुंबाची 'पॉवर'

Political News : महायुतीच्या विजयाची व महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे शोधली जात असतानाच सध्या राज्यातील एका मतदारसंघाची चर्चा जोरात सुरु आहे. या मतदारसंघावर 1952 पासून सलग एकाच कुटुंबातील लोकप्रतिनिधीचे वर्चस्व राहिले आहे.
Maharashtra Vidhansabha Election
Maharashtra Vidhansabha Election sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला आहे. बहुमत असल्याने लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र महायुतीच्या विजयाची व महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे शोधली जात असतानाच सध्या राज्यातील एका मतदारसंघाची चर्चा जोरात सुरु आहे. या मतदारसंघावर 1952 पासून सलग एकाच कुटुंबातील लोकप्रतिनिधीचे वर्चस्व राहिले आहे. (Assembaly Election News)

या ठिकाणी सलग 72 वर्ष झाले एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडून येण्याचा ऐतिहासिक विक्रम आहे. जवळपास पाऊण दशक विदर्भातील पुसद मतदारसंघावर नाईक घराण्याचे वर्चस्व आहे. राज्यात पहिल्यांदाच असे घडले की एकाच कुटुंबाचं या मतदारसंघावर वर्चस्व आणि सलग 72 वर्ष जिंकण्याचा विक्रम राहिला आहे. विशेषतः दोन मुख्यमंत्र्यानी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.

Maharashtra Vidhansabha Election
Ajit Pawar : अजितदादांच्या गुगलीवर एकनाथ शिंदे बोल्ड, नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपलाही धडा!

पुसद विधानसभा मतदारसंघाची धुरा गेल्या 72 वर्षांपासून नाईक कुटुंबाकडे आहे. या मतदारसंघावर 1952 पासून नाईक घराण्याने विजय संपादन केला आहे. 1952 पासून वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी पुसदमधून विजय मिळवला आहे. सलग पाच टर्म नाईकांनी हा मतदारसंघ राखला. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते.

Maharashtra Vidhansabha Election
Ajit Pawar : टायमिंग जुळलं नाही; अजितदादा म्हणाले, 'नाहीतर पवारसाहेबांचे...'

महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री झालेले वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 अशी सलग 12 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते. त्यानंतर 1978 पासून वसंतरावांचे पुतणे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव राजुसिंह नाईक यांनी सलग चार टर्म पुसदवर वर्चस्व राखले. 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 अशी पावणे दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते.

Maharashtra Vidhansabha Election
Ajit Pawar on Mahayuti Government : एकनाथ शिंदेंच्या पत्रकारपरिषदेवर बोलताना अजितदादांनी महायुतीच्या नव्या सरकारचा 'फॉर्म्युला'च सांगितला, म्हणाले...

1995 मध्ये त्यांचे बंधू मनोहरराव राजुसिंह नाईक यांनी पुसदमधून आमदारकी मिळवली. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) स्थापनेनंतर नाईक कुटुंबाने पक्षांतर केले. सुधाकररावांनी पुन्हा एकदा आमदारकी पटकवली. 2004 पासून 2019 पर्यंत सलग तीनदा मनोहरराव नाईक पुन्हा आमदार झाले. 2019 मध्ये मनोहररावांचे सुपुत्र इंद्रनील नाईक यांनी आमदारकी लढवत निवडणुकीत विजय मिळवला. ते यंदा सलग दुसऱ्यांदा कायम राहिले आहेत.

Maharashtra Vidhansabha Election
Ajit Pawar : अजितदादांचा शब्द; नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून साताऱ्याला मिळणार मंत्रिपद!

नाईक घराण्याचा असाही विक्रम

नाईक घराण्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. वसंतराव नाईक, सुधाकर नाईक यांनी राज्याची धुरा संभाळली. अविनाश नाईक आणि मनोहरराव नाईक यांच्या रुपाने दोन मंत्री पदे मिळाली तर निलय नाईक आणि इंद्रनील नाईक असे दोन आमदारही मिळाले. त्यामुळे असा एक अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे.

Maharashtra Vidhansabha Election
Assembly Election News : विधानसभा निवडणुकीत 132 पैकी तब्बल 75 जागा भाजपने 'अशा' जिंकल्या; 'या' नेत्याचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com