Manoj jarange Patil News : जरांगेंना सोपवलेल्या नव्या GR मध्ये 'सरसकट मराठ्यांना कुणबी' दाखल्याचा उल्लेख आहे का?

Manoj jarange Patil News : जीआरनुसार केवळ पात्र मराठा समाजाला ओबीसीमधून...
Manoj jarange Patil News :
Manoj jarange Patil News :Sarkarnama
Published on
Updated on

Manoj jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सलग नऊ दिवस उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम देत जरांगेंनी उपोषण स्थगित केले. यानंतर जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत आहेत. आज दवाखान्यात शाससनाच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. आज मंत्री संदीपान भुमरे यांनी नवीन जीआरचा मसुदा सुपूर्त केला आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj jarange Patil News :
EXPLAINER : मराठा आरक्षण लढ्यात ट्रेंडिंग शब्द ठरणारा 'क्युरेटिव्ह पिटिशन' आहे तरी काय ?

मराठवाडा विभागात मराठा समाजातील पात्र असलेल्या व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे निजामकाळातील पुरावे, कुणबी जात सिद्ध करणारी वंशावळी, कौटुंबिक शैक्षणिक पुरावे, महासुला संबंधातील पुरावे इत्यादीची पडताळणी करून दाखले देण्याबाबत मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या दि.७.९.२०२३ च्या संदर्भीय शासन निर्णयान्वये समिती स्थापन करण्यात आली आहे.

सरकारच्या नवीन जीआरमध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार का? याचा स्पष्ट उल्लेख आहे की नाही, याबाबत अधिक स्पष्टता आलेली नाही. जरांगे पाटील हे जीआरचं वाचन करून, त्याचा अभ्यास करून, याबाबत आपली भूमिका थोड्याच वेळात स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Manoj jarange Patil News :
Manoj jarange Patil Security : मनोज जरांगे पाटलांना सरकार 'Z+ सिक्युरिटी' पुरवणार ?

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. शासनाने तीन नोव्हेंबर रोजी काढलेला जीआर सोपवला. मात्र, या जीआरनुसार केवळ पात्र मराठा समाजाला ओबीसीमधून प्रमाणपत्र देणार आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीनुसार सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या मागणीबाबत अजून काही स्पष्टता दिसत नाही.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com