Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दगडफेक; नेमके घडतेय तरी काय ?

Laxman Hake News : शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावच्या बसस्टँडवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत काहीजण जखमी झाले असल्याचे समजते.
Matori Village
Matori Village Sarkarnama

Beed News : ओबीसींच्या प्रश्नावरून उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांनंतर आंदोलन तात्पुरते थांबवले होते. उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बुधवारपासून प्रा. हाके व नवनाथ वाघमारे यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला त्यानंतर बुधवारपासून त्यांनी आपल्या अभिवादन दौऱ्याला सिंदखेड राजा येथून सुरुवात केली.

गुरुवारी मराठवाड्यात ही महाएल्गार यात्रा आल्यानंतर प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या स्वागतासाठी जात असलेल्या ओबीसी बांधवांसह रॅलीवर शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावच्या बसस्टँडवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत काहीजण जखमी झाले असल्याचे समजते.

प्रा. लक्ष्मण हाके यांच्या महाएल्गार यात्रेच्या स्वागतासाठी जात असलेल्या ओबीसी बांधवांसह (Obc Reservation) रॅलीवर शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावच्या बसस्टँडवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकी, डिजेचे नुकसान झाले. त्यासोबतच या घटनेनंतर काहीजण जखमी झाले असल्याचे समजते.

या घटनेची माहिती समजताच चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे गाव मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेल्या मनोज जरांगे पाटलांचे आहे. याच ठिकाणी ही घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

Matori Village
OBC Reservation News : मराठा आंदोलकांसाठी रेडकार्पेट अन् आमच्या आंदोलनाकडे मात्र...; हाकेंनी राज्य सरकारला फटकारले

दरम्यान, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Matori Village
Video Laxman Hake Vs Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाकेंचे मनोज जरांगेंना प्रत्युत्तर, 'आरक्षण खिरापत नाही...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com