Manoj Jarange Patil : आता होऊनच जाऊ द्या, माझी, धनंजय मुंडे अन् त्या आरोपीची नार्को टेस्ट!

Dhananjay Munde controversy : धमकीचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःसह आमदार धनंजय मुंडे आणि आरोपींची नार्को टेस्ट घेण्याची ठाम मागणी करत राजकीय खळबळ उडवली आहे.
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde
Manoj Jarange Patil meets Jalna Superintendent of Police Ajaykumar Bansal, demanding narco tests in the alleged conspiracy to assassinate him.Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News : मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालीन अशी धमकी देणारी वाल्मिक कराड समर्थकाची एक आॅडिओ क्लीप व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवत आंदोलना दरम्यानच्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहे, असे म्हणणाऱ्यांना आव्हान दिले.

माझ्या विरोधात पुरावे असतील तर पोलीसांत गुन्हा दाखल करा, असे सांगतानाच माझ्या हत्येच्या घातपाताच कट आणि त्यात सहभागी असलेल्या आरोपीनेच आता नार्को टेस्टची मागणी केली आहे. तेव्हा एकदा आरोप, माझी आणि धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट कराच, असे आव्हानही जरांगे पाटील यांनी दिले.

गोळ्या घालण्याची भाषा करणारा आॅडिओ व्हायरल झाल्यानंतर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. ‘'माझा घातपात घडविण्याच्या कट प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने नार्को चाचणी करण्याचा अर्ज दिला आहे. त्याचा नार्को चाचणीसंदर्भातील अर्ज न्यायालयासमोर ठेवून तो मंजूर करून घेत पोलिसांनी चाचणीची परवानगी घ्यावी. या प्रकरणात तीन संशयितांना मिळालेला जामीन रद्द करून या तिघांसह माझी आणि आमदार धनंजय मुंडे यांचीही नार्को चाचणी करावी', अशी मागणी मनोज जरांगे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली.

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde
Beed News : अजित पवारांनी बीडसाठी पाहिलेलं स्वप्न आता सुनेत्रा पवार पूर्ण करणार; पालकमंत्री म्हणून विकासाची सूत्रे हाती

अमोल खुणे याने यापूर्वी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन माझ्यासह जरांगेंची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर जरांगे यांनी आज बन्सल यांची भेट घेतली. खुणे याच्या नार्को चाचणी करण्याच्या मागणीची पोलिसांनी अंमलबजावणी करावी. कारण धनंजय मुंडे शांत बसणार नाहीत. संशयितांना जामीन मिळाल्यामुळे पुन्हा माझा घातपात करण्याचा डाव धनंजय मुंडे रचणार आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला.

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde
Manoj Jarange Patil : सुनेत्राताईंनी अजितदादांसारखं खंबीर व्हावं, परिवाराची साथही सोडू नये! मनोज जरांगे पाटील शपथविधीवर बोलले..

दादा गरड, अमोल खुणे आणि कांचन साळवे यांना मिळालेला जामीन रद्द करून या तिघांसह माझी आणि धनंजय मुंडे यांची नार्को चाचणी करा. त्याशिवाय या प्रकरणाचे 'दूध का दूध, पानी का पानी', होणार नाही, असे जरांगे म्हणाले. समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या जिवाला धोका असतो. मला मिळणाऱ्या धमकीला घाबरत नाही. मला मारण्यासाठी ये, तुझे बोटही परत जाऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना दिला. दरम्यान, मला दिलेली सुरक्षा काढून घ्या, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे यापूर्वीच आपण केल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com