Manoj Jarange Patil News : लोकसभेनंतर जरांगे पाटील उडवणार धुरळा; तब्बल 900 एकरांवर सभा, 500 खाटांचे रुग्णालय...

Maratha Reservation News : जगातील सर्वात मोठी सभा घेण्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना यश येईल का?
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे रेकॉर्ड ब्रेक सभा घेणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सर्वात मोठी सभा घेण्याची घोषणा केली आहे. तब्बल 900 एकरांवर होणारी ही सभा जगातील सर्वात मोठी सभा असेल. तसेच, सभेसाठी 500 खाटांचे रुग्णालय उभारणार असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले. तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडाच्या परिसरात जून महिन्यातील 8 तारखेलाही सभा घेण्याची घोषणा त्यांनी केली. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, अपक्ष उमेदवार...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण केल्यानंतर काही दिवसांनी या ठिकाणी भव्य सभा झाली होती. यानंतर त्यांनी आंदोलनाच्या विविध टप्प्यांत राज्यभर सभा घेतल्या. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसादही मिळाला. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात त्यांनी मुंबईत उपोषणाचा इशारा देत मुंबईला कुच केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मोर्चेकरी माघारी फिरले. मात्र, समाजाला सरसकट कुणबी आरक्षणाबाबत सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावी झाली नाही. त्यामुळे समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Vasant More News : वसंत मोरेंनी सांगितलं जरांगे पाटलांच्या भेटीत नेमकं काय झालं?, म्हणाले...

नुकतेच त्यांनी 900 एकरांवर सभा घेण्याची घोषणा केली होती. सभेच्या तयारीबाबत शुक्रवारी श्री क्षेत्र नारायणगडावर बैठक झाली. याच गडावर आठ जूनला सभा घेण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. जगातली ही सर्वात मोठी सभा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सभेसाठी 500 खाटांचे तात्पुरते रुग्णालय देखील उभारण्यात येणार आहे.

देशभरातील समाजाची एकजुट या निमित्ताने सरकारला दिसणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह प्रलंबित प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बीड जिल्ह्याने (Beed) नेहमीच आरक्षणाच्या लढ्यात खंबीर साथ आणि चोख नियोजन केले. सदर सभा देखील यशस्वी करण्यात बीड मागे राहणार नाही.

प्रत्येकी 20 लोकांची समिती प्रत्येक गावांत सभेबाबत माहिती आणि नियोजन करणार आहे. सभेला येणाऱ्या कोणाचीही गैरसोय होणार नाही, यासाठी गडावर कशाप्रकारचे नियोजन असले पाहिजे याच्या सुचना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आयोजकांना केल्या. या बैठकीला जिल्हाभरातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Manoj Jarange Patil
BJP V/s Congress : निरुपम यांची भाजपची वाट खडतर? मोहित कंबोज म्हणाले, 'काँग्रेसचा कचरा...'

दरम्यान, या भव्य सभेला देशभरातून समाज बांधव एकत्र येतील. कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी त्यांच्या सोयीसाठी नारायणगडावर पाचशे खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची टिम सुद्धा तैनात असणार आहे. यामुळे कितीही गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली तरीही याठिकाणी तात्काळ त्या रुग्णांवर उपचार करता येतील, अशी सोय या ठिकाणी करण्यात येणार आहे. सदर रुग्णालय सहा दिवस कार्यरत असेल असेही मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com