Manoj Jarange Hunger Strike : उपोषणाचा तिसरा दिवस; तब्येत खालावली तरी पाणी घेण्यास नकार...

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : 'आरक्षण हाच आपल्यावरचा उपचार आहे..."
Manoj Jarange Indefinite Hunger Strike
Manoj Jarange Indefinite Hunger StrikeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Uposhan : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषण आंदोलनाचं आज तिसरा दिवस आहे. जरांगे यांनी उपोषणात पाणी, औषध, सलाइन, वैद्यकीय उपचारांचाही त्याग केला आहे. कालच्या तुलनेत त्यांची प्रकती खालावल्याचे दिसत आहे. कालपासून त्यांनी पाणीही न घेतल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. (Latest Marathi News)

पाणीही न घेतल्यामुळे जरांगेच्या शरीरावर त्याचा परिणाम होत आहे. काल डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी आले असता, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. आरक्षण हाच आपल्यावरचा उपचार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पाण्याचा थेंबही नसल्यामुळे त्यांना डीहायड्रेशनचा त्रास सुरू झाला आहे. अशक्तपण जाणवत आहे. बोलण्याचंही ते टाळत आहेत. कारण बोलण्यासाठीसुद्धा त्यांना त्रास जाणवत आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे बुधवारपासून अंतरवाली सराटी गावात जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने जरांगेंना आरोग्य तपासणीची विनंती केली. मात्र, आरोग्य तपासणीला नकार देत जरांगेंनी पथकाला आल्या हातीच परत पाठवलं.

आंदोलनाचा परिणाम -

जरांगेंच्या समर्थनार्थ राज्यभरात विविध गावांमध्येही सर्कलनिहाय साखळी उपोषण सुरू आहे. राज्यभरात जरांगेच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावपातळीवर विविध ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे, तर बीडच्या मादळमोही गावामध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान तीन आंदोलक मराठा तरुण मोबाईल टॉवरवर चढले होते.

पंतप्रधान मोदींवर टीका -

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डीत येऊन गेले, पण मराठा आरक्षणाबाबत अवाक्षरही बोलले नाहीत. आता जालन्यातील अंतरवाली सराटीत आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. 'पंतप्रधान मोदी आले. मात्र, मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. मोदींना मराठा आणि क्षत्रिय मराठ्यांची गरज राहिली नाही', असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

(Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com