Video Jarange Vs Bhujbal : "गंजलेल्या तलवारींना धार लावून ठेवा", भुजबळांचं विधान; जरांगे-पाटील म्हणाले, "आम्हीही..."

Manoj Jarange Patil News : "13 जुलैपर्यंत एकही शब्दानं उत्तर आपण देणार नाही. कारण, शंभूराज देसाईंनी शब्द दिला आहे. आपण दिलेल्या 9 मागण्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेऊ," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.
manoj jarange patil chhagan bhujbal
manoj jarange patil chhagan bhujbalsarkarnama
Published on
Updated on

तलावरी गंजल्यात त्या घासून ठेवा, असा भुजबळ यांचा इशारा 'डेंजर' आहे. याचा अर्थ छगन भुजबळांना मराठ्यांसोबत दंगल घडवून आणायची आहे. जाती-जातींमध्ये तेढं निर्माण करायचं आहे, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.

मराठ्यांनी शांततेत राहायचं. आपण पहिल्यांदा सुरूवात करायची नाही. पण, आपणंही तयारीनं राहावं, असं आवाहनं जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

छगन भुजबळ काय म्हणाले?

जालन्यातील वडीगोद्रीत मंत्री छगन भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) शेरोशायरीच्या माध्यमातून इशारा दिला होता. "जंग लगी तलवार पर अब धार लगानी होंगी... कुछ लोग अपनी औकात भुल गए... शायद अपनी याद उन्हे दिलानी होंगी," असं भुजबळांनी म्हटलं होतं.

यावर जरांगे-पाटील म्हणाले, "छगन भुजबळांचं विधान 'डेंजर' आहे. याचा अर्थ छगन भुजबळांना मराठ्यांसोबत दंगल घडवून आणायची आहे. जाती-जातींमध्ये तेढं निर्माण करायचं आहे, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. मराठ्यांनी शांततेत राहायचं. आपण पहिल्यांदा सुरूवात करायची नाही. पण, आपणंही तयारीनं राहावं."

manoj jarange patil chhagan bhujbal
Video Chhagan Bhujbal : "जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं", भुजबळांचा जरांगे-पाटलांना इशारा

"राज्यातील एकही मराठा बेसावध नसला पाहिजे. राज्यात मराठेच 50 ते 55 टक्के आहेत. जर, तसा काही प्रयोग झाला तर आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. जशास तसं आम्ही सुद्धा उत्तर देऊ. ते शांततेत राहिले, तर आम्ही शांततेत राहणार," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

manoj jarange patil chhagan bhujbal
Video Chhagan Bhujbal : भुजबळांनी जरांगे-पाटलांना घेतलं शिंगावर; म्हणाले, मला घरी बसवलं, तरी...

"भुजबळ तलवार चालविण्याचे इशारे देत असतील, तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे. यांनी काही प्रयत्न तर आम्हीही कडवट, कट्टर आणि क्षत्रिय मराठे आहोत. उत्तराला उत्तर देणारच," असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com