Jarange Vs Vikhe : जरांगे-पाटलांनी राधाकृष्ण विखे-पाटलांना सुनावलं; म्हणाले, "तुमच्यामुळे..."

Manoj Jarange Patil : मी कायद्याला धरून बोलत आहे. मग, काय आंदोलन भरकटलं?" असा सवालच जरांगे-पाटलांनी विखेंना विचारला आहे.
manoj jarange patil radhakrishan wikhe patil
manoj jarange patil radhakrishan wikhe patilsarkarnama
Published on
Updated on

मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करायचे बंद करावेत. तुमच्यामुळे एकदिवशी जात मरेल. वेळेवर शहाणे व्हा. अजून हातातून वेळ गेली नाही, असं म्हणत मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

राधाकृष्ण विखे ( radhakrishna vikhe patil ) संविधानाच्या पदावर आणि मंत्री आहेत. त्यांनी 1967 साली दिलेले आरक्षण वाचून पाहावे, असा सल्ला जरांगे-पाटलांनी दिला आहे. विखे-पाटलांनी केलेल्या विधानानंतर जरांगे-पाटलांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

विखे-पाटील काय म्हणाले?

"महायुती सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं आहे. पण, आता आंदोलन भरकटत चाललं आहे. जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत," असं वक्तव्य विखे-पाटील यांनी केलं होतं.

यावर जरांगे-पाटील म्हणाले, "विखे मी मराठा समाज नाही, असं म्हणत असतील तर नाही आहे. पण, आंदोलन भरकटलं आहे की काय हे विखेंना कळेल. 1984 च्या नोंदी महत्त्वाच्या की 1990 बिना नोंदीचं दिलेले आरक्षण महत्वाचं. जरा मराठ्यांना उत्तर देता का?"

manoj jarange patil radhakrishan wikhe patil
PM Narendra Modi यांनी केले पंडित नेहरूंचे कौतुक | Parliament Special Session

"सातारा संस्थानचं गॅझेट सांगतंय पश्चिम महाराष्ट्रातील मराठा ओबीसी आहेत. दौड संस्थान, बेळगावचा करार आणि बॉम्बे गॅझेट सांगतंय मराठा हा कुणबी एकच आहेत. विखे संविधानाच्या पदावर आणि मंत्री आहेत. 1967 साली दिलेले आरक्षण त्यांनी वाचून पाहावं. 2004 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांचं सरकार असताना मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कायदा केला होता. तेव्हाच्या सरकारमध्येही विखे-पाटील होते. मी कायद्याला धरून बोलत आहे. मग, काय आंदोलन भरकटलं?" असा सवालच जरांगे-पाटलांनी विखेंना विचारला आहे.

"भुजबळ मराठ्यांवर तलवारी काढा म्हणत आहेत, हे दिसलं नाही का? तुमच्या बंगल्यात तलवार येणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या मानेवर छगन भुजबळांची तलवार पडेल. आता सांगा कोण आंदोलन भरकटत आहे. जातीकडून कधीतरी बोलायला शिका. काय वेळ आलीय जातीवर. तुमच्या आसपासमधील सगळे ओबीसी नेते मराठ्यांविरोधात येत आहे. नगर जिल्ह्यातील ओबीसीचे माजी आमदार जालन्यात येऊन बोंबलत आहेत. ते भरकटलेले दिसत नाही का?" असा प्रश्न जरांगे-पाटलांनी विखेंना केला.

manoj jarange patil radhakrishan wikhe patil
Video Jarange Vs Bhujbal : "गंजलेल्या तलवारींना धार लावून ठेवा", भुजबळांचं विधान; जरांगे-पाटील म्हणाले, "आम्हीही..."

"मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करायचे बंद करावेत. तुमच्यामुळे एकदिवशी जात मरेल. वेळेवर शहाणे व्हा. अजून हातातून वेळ गेली नाही. मी मागे हटणार नाही. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देणार," असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com