Manoj Jarange Patil : प्रसाद लाड तुमचा राजीनामा नको, माझ्यासोबत उपोषणाला बसा; मनोज जरांगे पाटलांचा टोला!

Manoj Jarange Prasad Lad : प्रसाद लाड आम्हाला तुमचा राजीनामा नको, तुम्ही फक्त माझ्यासोबत उपोषणाला बसा, असा खोचक टोला जरांगे पाटील यांनी त्यांना लगावला.
Manoj Jarange Patil has appealed to BJP leader Prasad Lad to avoid resignation and join the ongoing hunger strike agitation.
Manoj Jarange Patil has appealed to BJP leader Prasad Lad to avoid resignation and join the ongoing hunger strike agitation.sarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखने

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडून भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना 22 मे रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेला पाठवण्यात आले होते. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही ना लाड यांच्याकडून जरांगे पाटील यांना फोन झाला ना, सरकारकडून काही निरोप आला. त्यानंतर आज रखरखत्या उन्हात उपोषणाची घोषणा करतानाच जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांना टोला लगावला.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, असे प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्या भेटीत सांगीतले होते. हाच धागा पकडत प्रसाद लाड आम्हाला तुमचा राजीनामा नको, तुम्ही फक्त माझ्यासोबत उपोषणाला बसा, असा खोचक टोला जरांगे पाटील यांनी त्यांना लगावला. आमदार प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील.

मुख्यमंत्री मराठ्यांचा किती द्वेष करतात हे आमदार लाड यांच्या लक्षात आले असेल. मी आता मागे हटणार नाही, उपोषण होणार म्हणजे होणारच. आमदार प्रसाद लाड यांचा आम्हाला राजीनामा नको, ते नुसते उपोषणामध्ये येऊन बसले तरी भरपूर झाले असेही जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil has appealed to BJP leader Prasad Lad to avoid resignation and join the ongoing hunger strike agitation.
Prasad Lad Meet Manoj Jarange: प्रसाद लाड यांच्या तोंडावरच मनोज जरांगेंकडून शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कौतुक!

सरकारकडून आमच्या कोणत्याच मागण्या मागणी मंजूर होत नाही, झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. हैदराबाद ,सातारा, गॅझेट सरकार लागू करत नाही. सरकारने गोड बोलून फसवले त्यामुळे त्यांच्या सोबत बैठका बंद केल्या आहेत. मराठा व कुणबी एक आहेत याचा अध्यादेश निघत नाही. मराठा- कुणबी याचे मंत्रालय सुरू होत नाही. सरकारने आमचे नुकसान केल्यामुळे आता आरपारची लढाई लढणार आहोत.

लाड यांचे डोळे उघडले असतील

हे सरकार क्रूर आहे, विदर्भ, मराठवाड्यातील जनता अडचणीमधून होरपळून निघत आहे. मुख्यमंत्री सहायता निधामधून लवकर मदत मिळत नाही. सरकार लक्ष देत नाही, समिती लक्ष देत नाही नुसती लावालावी होत आहे. प्रसाद लाड यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. त्यांना सगळ्या अडचणी सांगीतल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आमदार प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil has appealed to BJP leader Prasad Lad to avoid resignation and join the ongoing hunger strike agitation.
Manoj Jarange: जरांगे-लाड भेटीला सहा दिवस झाले, सरकारकडून कुठलाच निरोप नाही; उद्या जरांगे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बोलावली पत्रकार परिषद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com