manoj jarange patil nitesh rane.jpg
manoj jarange patil nitesh rane.jpgsarkarnama

Manoj Jarange patil : "नितेश राणेंनी माझा नाद करू नये, अन्यथा...", जरांगे-पाटलांची वॉर्निंग

Manoj Jarange Patil Vs Nitesh Rane : "राणेंना मराठा आरक्षणाची गरज वाटत नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांचं ऐकून आमच्या अन्नात माती कालवू नका," असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे.
Published on

मी नारायण राणे यांच्यावर कधी टीका केली नाही. मी त्यांचा आदर करतो. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्यानं त्यांना आदरानं दादा म्हणतो. मी नितेश राणेंना शेवटचं सांगतो, वाद थांबवायचा, तर थांबवा. माझ्या नादाला लागू नका. जीभ वळवळायची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला खूप पश्चाताप होईल, असं प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना दिलं आहे.

"मनोज जरांगे-पाटील याने नारायण राणे यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्यानं जास्त जीभ वळवळू नये. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची की नाही, हे आम्ही ठरवू," असा एकेरी उल्लेख आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला होता. त्यावर जरांगे-पाटलांनी प्रतिक्रिया देत नितेश राणे यांचा समाचार घेतला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

"माझ्या नादाला लागू नका"

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "मी नारायण राणे यांच्यावर कधीही टीका केली नाही. मी त्यांचा आदर करतो. त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्यानं त्यांना आदरानं दादा म्हणतो. मी नितेश राणेंना शेवटचं सांगतो, वाद थांबवायचा, तर थांबवा. माझ्या नादाला लागू नका. जीभ वळवळायची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला खूप पश्चाताप होईल. तुम्ही शहाणे व्हा. देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं चालवलं आहे. नारायण राणे किंवा त्यांच्या मुलाला दोष देण्यात अर्थ नाही. मी गोरगरीबांचं काम करत असल्यानं सगळ्यांना माझ्यावर सोडलं आहे."

manoj jarange patil nitesh rane.jpg
Maharashtra Politics : थिल्लर भाषा बोलणारे सुसाट; वय, पदाचेही भान सुटले

"...तेव्हा यांची पळताभूई थोडी होईल"

"फडणवीसांना मराठा-मराठ्यांमध्ये भांडणं लावायची आहेत. पण, मराठे एकदिवशी यांना धडा शिकवतील. तेव्हा यांची पळताभूई थोडी होईल," असं जरांगे-पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे.

"भगवा गमछा हा तेजस्वी आहे"

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि गळ्यातील भगवा गमछा बाजूला करून टीका-टिप्पणी करावी, असं नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) म्हटलं होतं. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटल म्हणाले, "तुमच्यासारख्या अन्याय करणाऱ्यांना वठणीवर आणायाचं छत्रपतींनी शिकवलं आहे. भगवा गमछा हा तेजस्वी आहे. भगव्या रंगाचं तेज तुम्हाला कळणार नाही. भगवा गमछा कुणी वापरावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कुणी बसावे, हे आम्हाला चांगलं कळतं. आम्ही छत्रपतींचा विचार चालवत असून त्यांचं हिंदुत्व पुढे घेऊन जात आहे. तुमच्या पक्षाचं हिंदुत्व चालवत नाही."

manoj jarange patil nitesh rane.jpg
Nitesh Rane Vs Shiv Sena Thackeray Party : शिवसेना ठाकरे पक्षावर चौफेर टीका; नीतेश राणे म्हणाले, 'मुंबईचे खरे लुटारी मातोश्रीवर'

"मी बिथरलो, तर पुन्हा मागे येणार नाही"

"तुम्ही मला अंगावर घेऊ नका. तुम्हाला मी संधी देतो. नारायण राणे यांनी समाजासाठी योगदान दिलं आहे. पण, मी बिथरलो, तर पुन्हा मागे येणार नाही. राणेंना मराठा आरक्षणाची गरज वाटत नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांचं ऐकून आमच्या अन्नात माती कालवू नका. तुम्हाला महाराष्ट्रात पळताभुई होईल. तुम्हाला शेवटची संधी देतो," असा इशारा जरांगे-पाटलांनी नितेश राणेंना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com