Manoj Jarange Patil : कोणाला निवडून देण्याचा आम्ही ठेका घेतलेला नाही ; जरांगेंचा रोख कोणाकडे ?

Manoj Jarange Patil's warning to the founders : आम्हाला आमच्या समाजातील गोरगरीब पोरांच भल करायचं आहे. गोरगरीब जनता आजा जागी झाली आहे, तुमच्या दबावाला ती बळी पडणार नाही. कोणी म्हणतो मी याला नोकरीला लावले, त्याला शाळेवर घेतले पण या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही समाजावर उपकार केलेले नाहीत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करता करता अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की मनोज जरांगे पाटील यांना आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत आहे. विधानसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्यांना प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केल्यानंतर अंतरवाली सराटीत अर्जांचे अक्षरशः ढीग लागत आहेत. यात गोरगरिब, समाजासाठी काही करु पाहणारे आहेत, तर काही प्रस्थापित. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आम्ही कोणाला निवडून आणण्याचा ठेका घेतलेला नाही, असे सांगत प्रस्थापितांना इशारा दिला आहे.

आपली राजकीय ताकद, निवडून येण्याची क्षमता, अनुभव याचा हवाला देत उमेदवारीवर दावा सांगणाऱ्यांचीही यात कमी नाही. पण अशा प्रस्थापितांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निर्वाणीचा इशारा देत आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का? अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत. अंतरवाली सराटी येथे विधानसभा इच्छुकांची गर्दी पहायला मिळते आहे.

येत्या 29 आॅगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवालीतून सुरु केलेल्या आंदोलनाला एक वर्ष पुर्ण होत आहे. या निमित्ताने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे कानाडोळा करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. लढायचे की पाडायचे? याचा निर्णय घेण्यासाठी होणारी 29 रोजीची बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांची गाडी अडवली, घोषणा देत प्रश्नांची सरबत्ती!

या पार्श्वभूमीवर अंतरवाली येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वर्षानुवर्ष संपत्ती, उद्योग-धंदे, कारखानदारीच्या जोरावर निवडून येणाऱ्यांना जरांगे यांनी चांगलेच सुनावले. (Maratha Reservation) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानाला उत्तर देतांना प्रस्थापितांना निवडून देण्याचा आम्ही ठेका घेतलेला नाही. मी चार वेळा, निवडून आलो, मी पाच वेळा निवडून आलो म्हणून मला उमेदवारी द्या, हे आता चालणार नाही.

आम्हाला आमच्या समाजातील गोरगरीब पोरांच भल करायचं आहे. गोरगरीब जनता आजा जागी झाली आहे, तुमच्या दबावाला ती बळी पडणार नाही. कोणी म्हणतो मी याला नोकरीला लावले, त्याला शाळेवर घेतले पण या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही समाजावर उपकार केलेले नाहीत. तो कष्ट करतो, म्हणून तुम्ही त्याला पगार देता, त्यांच्या जीवावर तुमचे व्यवसाय, उद्योग, संस्था मोठ्या झाल्या. त्यामुळे नोकरी देऊन तुम्ही उपकार केले नाहीत, हे लक्षात ठेवा.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange News : बीड, परळी, केजमधील इच्छुकांनी गाठले अंतरवाली सराटी; मविआ, महायुतीतील नेते जरांगेंच्या भेटीला

माझ्या समाजाला मागे ठेवून तुम्हाला निवडून देण्याचे काम आता होणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. राज्यातील विरोधी पक्षांनी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेला बंद आणि सुरु केलेले निदर्शने यावर मला काही बोलायचे नाही. घडलेली घटना दुर्दैवी आणि संतापजनक आहे.

ती लेक राज्याची देशाची आहे, त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. यात आम्ही राजकारण करत नाही, फक्त फडणवीसांवर टीका करायची म्हणून विरोधी पक्षाला चांगले म्हणायचे हे मी करत नाही. ज्या लेकींवर अत्याचार झाला, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com