Maratha reservation News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज येथे काँग्रेसची आढावा बैठक होत आहे. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांसह पक्षाचे विविध नेते उपस्थित राहिले.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले असता मराठा आंदोलकांनी अचानक त्यांची गाडी अडवली. छावा क्रांतिवीर संघटनेचे करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी श्री पटोले यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला.
यावेळी श्री पटोले गाडीतून बाहेर आले. त्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचे निवेदन स्वीकारले. मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले आहे.
या प्रश्नाचे गांभीर्य काँग्रेस पक्षाला चांगलेच कळते. आंदोलकांच्या भावनांशी सहमत असल्याचे सांगत, पटोले यांनी आंदोलकांना अस्वस्त केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेसने अतिशय वेगाने सर्व प्रक्रीया पुर्ण करीत आरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणा दिल्या. यावेळी श्री गायकर यांनी पटोले यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात अशांतता आहे. युवक आणि समाजात अस्वस्थता पसरली आहे.
युवक या विषयावर अत्यंत भावनिक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्य शासन योग्य प्रतिसाद देत नाही. अशावेळी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काय करीत आहे, असे विचारले. काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
श्री पटोले यांनी राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. या सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयावर विशेष अधिवेशन बोलवावे. त्या अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणाचा जो प्रस्ताव देईल त्याला आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबा देऊ, असे सांगितले.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मराठा आंदोलकांत विशेष नाराजी होती. श्री वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत आपली भिन्न भूमिका व्यक्त केली आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील मराठा आंदोलकांनी निवेदन दिले होते. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी खासदार सुळे यांच्याकडे केली होती.
गुरुवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाही विंचूर चौफुली येथे मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या जिल्हा आढावा बैठकीत नेत्यांना हाच प्रश्न विचारून कार्यकर्त्यांनी पुनरावृत्ती केली आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.