Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी महिनाअखेरपर्यंची मुदत दिली आहे. आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगे पाटील यांना भेटले. त्यांच्या मागण्या समजवून घेत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीत जरांगे हे आपल्या मागण्यासाठी आक्रमक दिसून आले.
लाड यांच्याशी चर्चा करताना त्यांनी ओबीसींना आरक्षण कसे मिळाले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले, 'सरसकटची मागणी होती ती पण मान्य नाही केली. ओबीसींना कोणत्या निकषावर आरक्षण दिलं आहे. 89-90 ला मंडल गठीत केला गेला. मंडलला तीन कामं सांगितलं जाती. ओबीसीमध्ये घ्यायच्या आहेत त्याची यादी तयार करा, ओबीसींची जनगणना करा, ज्या जातींना आरक्षण द्यायचा त्यांना मागास सिद्ध करा. मग मंडलने कोणता सर्व्हे केला ते आम्हाला सांगा.'
'मंडलने ना जनगणना केली, ना त्या कोणती जात मागास सिद्ध केली, मागास सिद्ध नाही काही नाही आणि आरक्षण मिळाले, ओबीसींना कशामुळे आरक्षण मिळाले? मंडलने आरक्षण किती दिलं 14 टक्के, लोकसंख्येच्या निम्मे आरक्षण दिले. मंडलने ओबीसींची लोकसंख्या 28 टक्के झाली, चार वर्षांनी १९९४ ला ओबीसीला आरक्षण होते ते आरक्षण ३० टक्क्यांवर गेलं. म्हणजे लोकसंख्या किती झाली ६० टक्के झाली. ती कशी झाली? कशाचे आधारे हे आरक्षण दिलं? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
चार वर्षात छगन भुजबळची लोकसंख्या ६० टक्के झालीच कशी काय? ओबीसीची लोकसंख्या ६० टक्के कशी झाली याचं उत्तर आम्हाला द्या. हे कुणाला मान्य आहे का? हाणलं मराठ्यांचा आरक्षण,असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केला.
ओबीसींच्या यादीत ८३ क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असल्याची नोंद आहे. 2004 चा जीआर आहे. तो रद्द का केला? ओबीसींना आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून मराठ्यांचा एक मोर्चा दाखवा. आम्ही जर त्याच्यात नसू तर देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा कुणबी एक आहे का नाही, असा सवाल देखील त्यांनी केला.
जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ म्हणतो की आमची लोकसंख्या 60 टक्के आहे. बरं मग मान्य करू की त्यांची लोकसंख्या 60 टक्के आहे. मग गणित लावा बरं 60 टक्के ओबीसी, 20 टक्के एससी एसटी, 34 टक्के मराठा आहे. मग एकुण किती झाले? 150 टक्के लोकसंख्या असती का? असा सवाल देखील त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.