Manoj Jarange Rally: जरांगे पाटलांचा नादच खुळा! सभास्थळी 150 डॉक्टर, 50 फार्मासिस्ट, परिचारिकांची 10 पथकं

Manoj Jarange rally in Antarwali Sarati and Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: जालन्यातील अंतरवाली सराटीत 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील यांची जंगी सभा होणार आहे. या सभेची मोठी तयारी करण्यात आली असून, मराठा आरक्षणाच्या मागणीची पुढील रणनीती या सभेत ठरणार आहे. जरांगे पाटलांची ही सभा तब्बल 100 एकरांमध्ये होणार आहे. या सभेसाठी नियोजित स्थळाची साफसफाई करण्यात आली असून, या सभेत खासगी व शासकीय आरोग्य यंत्रणाही सतर्क असणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत तब्बल 150 खासगी डॉक्टर, 10 फिजिशियन तसेच 50 फार्मासिस्ट आणि परिचारिका, प्रशिक्षणार्थी यांची 10 पथकं तैनात असणार आहेत. तसेच 108 च्या रुग्णवाहिकाही जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयार ठेवल्या आहेत. या सभेवेळी कुणाची तब्येत बिघडली किंवा कुणाला काही त्रास झाला तर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खबरदारी म्हणून मराठा वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून डॉक्टरांची सुविधा असणार आहे.

Manoj Jarange
Maratha Vs OBC Reservation : आरक्षणाचा तिढा! मनोज जरांगे-छगन भुजबळांतील वाद चिघळणार?

अंतरवाली सराटीच्या या सभेला लाखो समाज बांधव जमणार आहेत. त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी मराठा वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जवळपास 150 डॉक्टरांची फौज असणार आहे. या बरोबरच जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेनेदेखील दहा पथके शुक्रवारपासून तैनात ठेवली आहेत.

अंतरवालीच्या सभेसाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनदेखील समाज बांधव जिल्ह्याच्या हद्दीतून जाणार आहेत. त्यांना प्रवासात काही आरोग्याची तक्रार जाणवली तर त्यांच्यावर वाटेतच उपचाराची सोय जिल्हा रुग्णालयाने केली आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange News : मी राजकारणात जाणार नाही, ती आपली वाट नाही; मनोज जरांगे पाटलांची भूमिका

अशी असणार आरोग्य सुविधा

अंतरवालीच्या (antarwali sarati) सभेसाठी जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यांतून समाज बांधव येणार आहेत. त्यामुळे त्यांना काही आरोग्याची तक्रार जाणवली तर त्यांना लगेचच उपचाराची सोय मिळावी, यासाठी आहेरवडगाव फाटा, मांजरसुंबा, गढी फाटा, बीडच्या बाह्यवळणाचा महालक्ष्मी चौक, पेंडगावचे हनुमान मंदिर, राक्षसभुवन फाटा, वडवणीचा मुख्य चौक, तेलगाव चौफाळा, घाटसावळी चौक, चऱ्हाटा चौक आदी ठिकाणी एकेक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी औषधींसह तैनात करण्यात आले आहेत.

तसेच याच काळात आरोग्य सेवेसाठी 108 च्या रुग्णवाहिकादेखील जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयार ठेवल्या आहेत. त्याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकांना पत्र देण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ते शनिवारची सभा संपून लोक परत जाईपर्यंत रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात, असे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांनी दिले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Manoj Jarange
Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगेंनी दिल्लीही हलवली..; कौन है मनोज जरांगे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com