Solapur News : मराठा आरक्षणानंतरही आपण राजकारणात येणार नाही. मला कोणत्याही पक्षाकडून ऑफर नाही. ती वाट आपली नाही. तसं बोलण्याची कोणामध्येही हिम्मत नाही आणि मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही, अशा शब्दांत राजकीय प्रवेशाची शक्यता मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावली. (I will not enter politics: Manoj Jarange Patil)
पंढरपुरात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, मराठ्यांना आक्षरण दिल्याशिवाय माघार नाही. सर्वच नेत्यांनी एकत्र यावे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यावे, पण मराठ्यांना आरक्षण द्यावे. त्याच्याशिवाय सुटी नाही. मी माझ्या समाजाशी प्रमाणिक आहे.
राजकारणाचा आपल्याला गंधच नाही. मला त्याची आवड असती तर माझ्याशेजारी सर्व मंत्री व पुढारी येऊ बसायचे. मी मराठ्यांशी गद्दारी करणारा नाही. जातीशी मी गद्दारी करूच शकत नाही. ज्याला मायबाप मानतो ना, त्यांच्याशी गद्दारी करायची नसते, असेही त्यांनी नमूद केले.
जरांगे पाटील म्हणाले की, एक महिनाभर मंत्री माझ्याशेजारी येऊन बसत होते. पण आपण कशातच रस दाखवला नाही. आपण आपल्या समाजाशी प्रमाणिकपणा ठेवला आहे. त्याबाबत माझ्याकडे कोणीही बोट दाखवू शकत नाही. कारण मी माझ्या जातीला मायबाप मानलं आहे. मायबापाशी गद्दारी करणं माझ्याकडून शक्य नाही आणि ते होणारही नाही. मी समाजाचं लेकुरं आहे, असा त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आपला मुलगा आपल्याशी दगाफटका करणार नाही, हे त्यांच्या डोक्यात फिट झालं आहे. त्यामुळे मीही त्यांच्याशी कधीही दगाफटका करणार नाही.
ओबीसी समाजाने नेत्यांचे ऐकण्यापेक्षा थोडं समजून घेतलं पाहिजे, की राज्यातील संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये गेलेला आहे. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील अर्धा भाग येथील मराठा समाज ओबीसीमध्येच आहे. थोडासा मराठा समाज बाहेर राहिलेला आहे. जवळपास ५ कोटी मराठा धरला जातो. जवळपास सगळा मराठा आरक्षणामध्ये गेलेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातील मराठा आरक्षणापासून वंचित आहे. हे जर त्यांनी समजून घेतले तर ते आरक्षणाला विरोधच करणार नाहीत, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.