Manoj Jarange Patil : आंदोलन खूप झाली, आता सत्तेत जाऊनच आरक्षण घेऊ..

Now we will get reservation after coming to power : राज्यात पहिल्यांदा गोरगरिबांची लाट आली आहे. विधानसभा निवडणुक लढवू इच्छूनाऱ्यांचे अर्ज, प्रस्ताव येत्या 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान अंतरवाली सराटीत घेतले जाणार आहेत. या प्रस्तावावर 29 ऑगस्ट रोजी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल,असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Maratha Reservation News : आरक्षणाच्या आडून आम्हाला राजकारण करायचे नाही, हे मी वारंवार सांगतोय. पण आंदोलनाची दखलच घ्यायची नाही, अशी जर सरकारची भूमिका असेल तर मग आम्ही सत्तेत येऊनच आरक्षण मिळवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. अंतरवाली सराटी येथे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात करण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वर्षभरापासून आम्ही आंदोलन करतोय, पण त्याची दखल सरकारला घ्यावीशी वाटत नाही. आता सत्तेत येऊनच आरक्षण मिळवावे लागेल,असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. मराठा आरक्षण आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, तो गोरगरिब मराठ्यांच्या न्याय, हक्काचा विषय आहे. त्यामुळे आरक्षणाचा आधार घेऊन आम्हाला राजकारण करायचे नाही.

सत्ताधारी, विरोधक मला उघडे पाडायला निघाले आहेत, आरक्षणाचा लढा एक वर्षापासून सुरु आहे. पण आता आरक्षण मिळवण्यासाठी सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही. आजपासून सोलापूर येथुन शांतता रॅली काढत आहे. याला मोठा प्रतिसाद मिळणार आहे. न्याय हक्कासाठी जनता आता घरात बसणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.

Manoj Jarange Patil
Video Maratha Protester Vs Raj Thackeray : मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं; मुक्कामी असलेल्या धाराशिवमध्ये वातावरण तापलं

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील आज सायंकाळी तुळजापूरला रवाना झाले. तत्पुर्वी माध्यमांनी विचारेल्या विविध प्रश्नांना जरांगे यांनी उत्तरे दिली. (Maratha Reservation) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन मराठवाडा राबवण्यात येणार आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर हे मिशन आरक्षण विरोधी आहे. यांनी शेतकरी, गरीब यांच्या कल्याणा करीता मिशन राबवावे.

आमदार निवडुन आणण्यासाठी हे मिशन आहे, यांचे मिशन चालू झाले कि आम्ही पण मिशन राबवणार आहोत, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. काही मराठा आंदोलक यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राज्यात सध्या आंदोलन चालू नाही, ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणता निरोप आलेला नाही. फडवणीस यांच्या माध्यमातुन माझ्याविरोधात अभियान राबवले जात आहे. मला घेरण्याचा, उघडे पाडण्याचा व बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. पण जनता हुशार आहे, यांचा डाव यशस्वी होणार नाही, आम्ही यासाठी सज्ज आहोत.

Manoj Jarange Patil
Video Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांनी कुणालाही किंमत देऊ नये, जरांगे-पाटील राज ठाकरेंवर संतापले

राज्यात पहिल्यांदा गोरगरिबांची लाट आली आहे. विधानसभा निवडणुक लढवू इच्छूनाऱ्यांचे अर्ज, प्रस्ताव येत्या 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान अंतरवाली सराटीत घेतले जाणार आहेत. या प्रस्तावावर 29 ऑगस्ट रोजी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल,असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी राज्यातील मोठा समाज उपस्थित राहणार आहे. या मध्ये निवडणुकी बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. शासनाने जे 10 टक्के आरक्षण दिले आहे, त्यामुळे ईडब्युलस आरक्षण रद्द झाले. त्यामुळे तीन पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com