मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात आरक्षणाबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. "महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही," असं विधान राज ठाकरे यांनी केल्यानंतर मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते.
धाराशिव येथील मुक्कामी असलेल्या राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना भेट न दिल्यानं एकच गोंधळ घातला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"कुणालाही किंमत द्यायची नाही. कुणाला कशाला जाब विचारायचा? त्यांच्या कशाला पाया पडायला जायचं? त्यांच्या तोंडासमोर सुद्धा उभे राहायचं गरज नाही. सगळ्यांनी शांत राहायचं," असं आवाहन जरांगे-पाटलांनी आंदोलकांना केलं.
मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "राज ठाकरे यांना काय जाब विचारायचा आहे? यांना आरक्षण म्हणजे काय आहे, हे त्यांना कधी कळणार नाही? हे गोरगरीब मराठ्यांच्या जिवाशी खेळणारे लोक आहेत. राज ठाकरे सुद्धा सत्तेचाच भाग आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात बोलण्यासाठी षडयंत्र रचलं आहे. श्रीमंत राजकारणी लोकांना गोरगरीब मराठ्यांचा प्रश्न कळणार नाही. कारण, हे श्रीमंतीत जगणारे आणि पैशांच्या गादीवर झोपणारे लोक आहेत."
"जो रात्रंदिवस काबाडकष्ट करतो, हमाली करतो, पैसे व्याजानं काढून पोराला शिकवतो, तरी त्यांच्या मुला-मुलींना नोकरी लागत नाही. त्या मुला-मुलींची परिस्थिती काय होते? हे गोरगरीब मराठ्यांना माहिती आहे. त्यांना ( राज ठाकरे ) याची माहिती नाही. पैशांच्या जोरावर वेदना कळत नाही. त्यामुळे त्यांना कशासाठी भेटायचं? कुणालाही किंमत द्यायची नाही. कुणाला कशाला जब विचारायचा? त्यांच्या कशाला पाया पडायला जायचं? त्यांच्या तोंडासमोर सुद्धा उभे राहायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं," असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं.
दरम्यान, धाराशिव येथील हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी तीन तास आंदोलन केलं. रात्री 9 वाजता 5 जण राज ठाकरे यांना भेटतील, असं ठरलं. इन कॅमेरा चर्चा झाली. आंदोलकांनी राज ठाकरे यांना आरक्षणप्रश्नी भूमिका विचारली. तेव्हा, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, याचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी केला. सगळेजण तुम्हाला फसवत आहेत. हे जरांगे-पाटील यांनाही माहिती आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.