

Manoj Jarange on Vilas Ghule: विलास घुले हत्या प्रकरण दुर्दैवी असून कोणाच्याही घरातील व्यक्तीची अशा प्रकारे हत्या होणं दुःखद आहे. अशावेळी यात राजकारण, जात आणू नये. दुर्दैवाने ती काही मंडळींकडून आणली जात आहे. बीडचे एसपी, एसआयटी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे, तो त्यांना करू द्यावा. घुले कुटुंबियांनी न्यायासाठी आमची मदत मागितली तर ती निश्चितच करण्याची आमची तयारी आहे. आम्ही सगळे या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही मनोज जरांगे यांनी विलास घुले हत्या प्रकरणावर भाष्य करताना दिली.
जरांगे म्हणाले, परळीवाल्याच्या नादाला लागून कोणावरही खोटे आरोप करू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले हत्या प्रकरण चांगलेच गाजत असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. 'हा खूप अवघड आणि सिरीयस विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून एसआयटीने मुळापर्यंत तपास करावा'अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
परळी पॅटर्न राबवून खोटे गुन्हे दाखल झाले का? याची संपूर्ण माहिती सरकार आणि तपास यंत्रणांनी घ्यावी, मी सुद्धा माहिती घेणार आहे. एसआयटीने याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि सखोल चौकशी केली पाहिजे. घुले बंधूला आणि कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करायला लावणार, शांत बसणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
एसआयटी खोटा तपास करणार नाही. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेतले जाते पण त्यात काही आढळून आले नाही, आता नवीन काय प्रकरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. नरसापूर प्रकरणात जशी आरोपीला शिक्षा झाली, तशीच शिक्षा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना झाली पाहिजे, अशी अपेक्षाही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
20 जून रोजी टाकळी फाटा येथील हॉटेल गावकरीमध्ये उमेश माने याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याची चाकूने हत्या करण्यात आली. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल असून सगळ्या आरोपीना अटक झाली आहे. पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव आल्याने वाद वाढल्यानंतर आयपीएस अधिकारी वेंकटराम यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने नुकतीच त्यांची चार तास चौकशी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.