Devendra Fadnavis : विशाळगडावरील अतिक्रमणावर देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान; म्हणाले...

Vishalgad Encroachment : विशाळगडावरील अतिक्रमण काढले पाहिजे, ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने, नियमाने तोडले गेले पाहिजे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : कोल्हापुरातील शाहुवाडीमधील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. या अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन छेडले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेक हिंदुत्व संघटनांनी तेथे जाऊन तोडफोड केली.

यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा कडक शब्दांत समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण काढले पाहिजे, ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने, नियमाने तोडले गेले पाहिजे, अशी सरकारची भावना आहे. त्यादृष्टीने त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सराकारच्या वतीने कारण्यात येणार आहे. मात्र आताची तेथे निर्माण झालेली स्थिती निवळण्यासाठी आमची प्राथमिकता आहे.

आता केवळ विशाळगडच नाही तर राज्यातील ज्या गडांवर अतिक्रमण झालेले आहे, ते काढले गेले ही सरकारची भावना असल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले. विशाळगडावरील घरांची झालेली तोडफडीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. त्यामुळे विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत आघाडीवर ठेवण्याची महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे.

Devendra Fadnavis
Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : शंकराचार्य आले अन् भाजप, शिंदे गटाची झोप उडवून गेले!

या अतिक्रमावरून सुरू असलेल्या राजकारणावर विचारले असता फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. विरोधकांच्या भूमिकेचे मला आश्चर्य वाटते. शिवरायांच्या इतिहासावर, गडांवर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. आता ते अतिक्रमण निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखते?, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आघाडीच्या नेत्यांनी आता स्पष्ट केले पाहिजे की ते शिवरायांच्या बाजूने आहेत, की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणारे आणि हिरवे झेंडे फडकावणाऱ्यांच्या बाजूने आहेत? असे आव्हानही फडणवीसांनी केले. तसेच आता हे अतिक्रमण काढण्यावरून, आणि कोणा एका समुहाची मते घेण्यासाठी कोण राजकारण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

Devendra Fadnavis
Sharad Pawar Vidarbh : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात मोठा ‘स्कोप'! असे आहे गणित...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com