Manoj Jarange News : मनोज जरांगे यांचा मोठा इशारा; म्हणाले, 'हे सरकार 12-13 दिवसांचेच, नंतर...'

Maratha Reservation Protest : बेमुदत आंदोलन मागे घेतले असून, अंतरवाली सराटी परिसरात सरकारच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांतील नातेवाइकांनाही आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे ऑगस्ट 2023 पासून आंदोलन करत आहेत. मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारने त्यांच्या मागणीनुसार सगेसोयऱ्यांबाबत अधिसूचनाही काढली होती. मात्र, विशेष अधिवेशनात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देण्यात आले.

सरकारच्या या भूमिकेवर संतप्त झालेल्या जरांगेंनी (Manoj Jarange) हे दहा टक्के आरक्षण घेणार नाही. आणि आता सरकारकडेही जाणार नाही. सरकार आता 12-13 दिवसांचेच आहे. त्यानंतर ते जनतेच्याच हातात जाणार, असे विधान केले आहे. त्यामुळे आगामी काळात आरक्षणाचा तिढा वाढण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. दरम्यान, अधिवेशनात जरांगेंच्या मागणीवर काय निर्णय होणार, याकडेही लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Devendra Fadnavis : जरांगेंच्या गंभीर आरोपांनंतर फडणवीसांचं मोठं पाऊल; भाजप आमदारांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

जरांगे पाटलांनी रविवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra fadnavis) अनेक गंभीर आरोप केले. तसेच त्यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोलही केला. त्यानंतर जरांगेंनी सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पुन्हा निशाणा साधला, तर सरकारलाही मोठा इशारा दिला आहे. जरांगे म्हणाले, सरकारने 10 टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला गाजर दिले आहे. ते 10 टक्के आरक्षण घेऊ शकत नाही. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. ते आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.

Manoj Jarange
Maharashtra Budget Session 2024 : जरांगेंची मागणी सगेसोयऱ्यांबाबत अधिवेशनात काय निर्णय होणार?

आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारशी वारंवार चर्चा केली. त्यांना सर्व मागण्यांबाबत माहिती होती. आता मात्र सरकारकडे जाणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहणार आहे. सरकार फक्त 12-13 दिवसांचेच आहे, नंतर जनतेच्याच हातात असणार आहे. जरांगेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत. दरम्यान, जरांगेंच्या या टीकेचा सत्ताधाऱ्यांनीही सडेतोड समाचार घेतला आहे. जी भाषा शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलतात, तीच जरांगे कशी बोलतात, असा आरोप फडणवीसांसह सत्ताधारी आमदारांनी केला आहे.

अंतरवाली सराटीत गेल्या दोन आठवड्यांपासून जरांगेंचे बेमुदत आंदोलन सुरू होते. ते आंदोलन स्थगित करून जरागेंनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच गावागावांत सुरू असलेले बेमुदत आंदोलने मागे घेण्याचेही आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. यासह त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा दोन दिवसांत ठरवू, असेही स्पष्ट केले. दरम्यान, अनूचित प्रकार टाळण्यासाठी अंतरवाली सराटी परिसरात संचारबंदी लागू केलेली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Manoj Jarange
Manoj Jarange Latest News : मोठी बातमी! मनोज जरांगेंचे बेमुदत उपोषण मागे; आंदोलनाबाबत घेतला 'हा' निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com