Maharashtra Political News : मराठा आरक्षणाबाबत आंदोलक मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मराठा समाज निवडणुकीत फडणवीस आणि भाजपला जागा दाखवून देईल, असा निर्वाणीचाही इशारा जरांगेंनी दिला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी फडणवीसांनी मराठा समाजाबाबत आमदारांना महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती आहे. (Devendra Fadnavis)
अर्थ संकल्पीय अधिवेशन व मराठा आरक्षण आंदोलन याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमदारांच्या मतदारसंघातील कामांचा आढावाही घेतल्याचे बोलले जात आहे. तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत फडणवीसांनी आमदारांना आंदोलन संयमाने हाताळण्याच्या सूचना करत आपण मराठा समाजासोबत असल्याचा संदेश पोहाेचवण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आपण पाठीशी आहोत, हे तुम्ही मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचवा. आपल्याला आरक्षण मुद्दा संयमाने हाताळावा लागेल. भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे, यात काही दुमत नाही. यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण आपल्या सरकारने दिले होते. ते उच्च न्यायालयात टिकवले होते. आताही आपण दिलेले आरक्षण आपणच ते टिकवणार आहोत हे समाजापर्यंत पोहाेचवा, असे आवाहन फडणवीसांनी आमदारांना केल्याची माहिती आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक जरांगेंनी (Manoj Jarange) फडणवीसांवर जिवे मारण्याचे आरोप केले आहेत. त्यासाठी त्यांनी सलाइनमधून विष देण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांकरवी गोळ्या घालून एन्काउंटर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप केले. यावर फडणवीसांनी मनोज जरांगे आता वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलत असल्याची टीका केली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.