Praniti Shinde On Chandrakant Patil : प्रणिती शिंदेंनी केला चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा’ असा उल्लेख!

Solapur MP Tour : सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी सध्या सुसाट सुटली आहे. प्रत्येक कार्यक्रमात त्या भाजपवर आसूड ओढायची एकही संधी सोडत नाहीत.
Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 June : सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी सध्या सुसाट सुटली आहे. प्रत्येक कार्यक्रमात त्या भाजपवर आसूड ओढायची एकही संधी सोडत नाहीत. मोदींपासून माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच नेत्यांवर त्या सडकून टीका करत आहेत. काल तर त्यांनी कहरच केला, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख तोंडाने इशारात करत त्यांनी ‘चंपा’ असा केला, त्यामुळे शिंदे यांच्या विधानांची एकच चर्चा सुरू आहे.

खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांचा बुधवारी (ता. १९ जून) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे गावभेट दौरा होता. त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आगामी आषाढी एकादशी आणि जिल्ह्यातील पर्यटन संदर्भात सर्व लोकप्रतिनिधीची बोलावली होती. त्या बैठकीला सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सोलापूरमधील बैठकीमुळे कार्यक्रमाला उशीर झाल्याने त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते. ह्या कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती. मला कार्यक्रमाला यायला दुपारचे दोन वाजले. मी जवळपास गावापर्यंत आले होते. मात्र मला यू टर्न घ्यावा लागला. कारण आपले पालकमंत्री चंपा... असा उल्लेख त्यांनी केला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

कंदलगाव येथील कार्यक्रमाला यायला उशिरा झाल्याचे कारण देत असताना त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख तोंडाने इशारा करून ‘चंपा’ असा करत त्यांच्यामुळे या ठिकाणी पोचायला विलंब झाल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.

Praniti Shinde
Praniti Shinde : आता भाजपचा त्रास सहन करायचा नाही; आता त्रास देण्याची वेळ : प्रणिती शिंदेंचे विधान

दरम्यान, दक्षिण सोलापूरमधील एका शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमातही आज (ता. २० जून) असेच विधान केले आहे. भाजपने मागील भाजपमुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी आणि त्यांच्या सभासद शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. आता काँग्रेसची सत्ता आलीय, त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आलीय, त्यामुळे मागील 10 वर्षांत तुम्हाला जो त्रास झाला आहे, तो पुसून काढायचा आहे , असेही म्हटले आहे.

Praniti Shinde
Dhairyasheel Mohite Patil : चंद्रकांतदादांचं माझ्यावर विशेष प्रेम, निधीत झुकतं माप देतील; मोहिते पाटलांकडून पाटलांचे कौतुक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com