Sumita Jarange News : सुमित्रा जरांगे मराठा आरक्षणाच्या लढाईत; तुळजाभवानीला घालणार साकडं

Maratha Reservation News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी गुरुवारी (ता.2) उपोषण मागे घेतले.
Sumita Jarange News
Sumita Jarange News Sarkarnama
Published on
Updated on

Tuljapur Political News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी गुरुवारी (ता.2) उपोषण मागे घेतले. या वेळीही त्यांनी राज्य सरकारला पुन्हा 24 डिसेंबर 2023 पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, लढाई सुरूच राहणार असल्याचाही इशारा दिला आहे, पण त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या लढाईत आता त्यांची पत्नी सुमित्रा जरांगे पाटील यांनीही उडी घेतली आहे.

पतीच्या खांद्याला खांदा लावून आता सुमित्रा जरांगेही त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरणार आहेत. सुमित्रा जरांगे यांच्या हस्ते तुळजापूर येथे आई तुळजाभवानीची महाआरती होणार असून, या आरतीपासून त्या मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरणार आहेत. 'मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढाईला यश येऊ दे,' असे साकडेही त्या देवीला घालणार आहेत. त्यानंतर तुळजापुरात महिला पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या या लढ्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sumita Jarange News
Supriya Sule Letter To Om Birla : खासदार सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा; सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी!

मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा मनोज जरांगे या शुक्रवारी (ता. 3) तुळजापुरात मराठा आरक्षणांच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. तुळजापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी महिला पदयात्रा निघाली असून, या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग आहे. तसेच वकील संघटना आणि तृतीय पंथियांच्यासुद्धा सहभाग आहे. आज जरांगे यांच्या पत्नी तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते तुळजाभवानीची महाआरती करण्यात येणार आहे.

- मनोज जरांगेंचे उपोषण मागे, पण सरकारची धडधड कायम

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन समजूत काढली. यात त्यांना यशही आले. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्तींसह मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, अतुल सावे, संदीपान भुमरे यांचाही समावेश होता, पण याचवेळी त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. उपोषण मागे घेतानाच सरकारची धडधड कायम राहील, याची काळजीदेखील घेतली आहे.

- मागील 62 दिवसांपासून ते घरी आले नाहीत

जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. हा लढा लढताना गेल्या दोन अडीच महिन्यांपासून ते स्वत:च्या घरीही गेलेले नाहीत, पण त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी आणि जरांगे यांचे वडील खंबीरपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे.

- सुमित्रा जरांगे म्हणतात

पतीच्या आरक्षणाच्या लढाईबाबत बोलताना जरांगेंच्या पत्नी म्हणाल्या होत्या की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्येला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. आता त्या शपथेला जागून त्यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, पण तरुणांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

Edited By- Anuradha Dhawade

Sumita Jarange News
ShivSena News: शिवसेनेच्या शाखा कुणाच्या ? दिघेंनी सुरू केलेल्या शाखेवर शिंदे गटाचा ताबा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com