Maratha Reservation News : मनोज जरांगे अ‍ॅक्शन मोडवर; चार जूनच्या आंदोलनाची तयारी सुरू...

Maratha Reservation in Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठीचे राज्यातील मतदान संपल्यानंतर मनोज जरांगे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. अंतरवालीमध्ये आंदोलनासाठी गोदाकाठच्या 123 गावांच्या बैठका सुरू असून यातून नियोजन केले जात आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, सगेसोयरे अंमलबजावणी या जुन्याच मागण्यांसाठी येत्या चार जून पासून मनोज जरांगे (Manoj Jarange) अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीसाठीचे राज्यातील मतदान संपल्यानंतर मनोज जरांगे अ‍ॅक्शनमोडवर आले आहेत. अंतरवालीमध्ये आंदोलनासाठी गोदाकाठच्या 123 गावांच्या बैठका सुरू असून यातून नियोजन केले जात आहे.

राज्य सरकारने काढलेल्या अद्यादेशाची अंमलबजावणी केली नाही अन् उपोषण लांबले तर, त्यासाठीची पूर्वतयारी कशी, असावी यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि त्यांचे सहकारी कामाला लागले आहेत. अंतरवालीत झालेल्या शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीत झाली. यात उपोषणस्थळी विविध सुविधांसह मंडप आणि पावसापासून लोकांचे सरंक्षण व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणात पत्रे टाकण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी गोदाकाठच्या 123 गावांमधून प्रत्येकी एक पत्र देण्याचे ठरले. याशिवाय उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा, याची जबाबदारी घ्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil News
Ahmednagar News : पाचशे वर्षांच्या परंपरेला तडा जाणार? अहमदनगर ते अहिल्यानगर; नामांतरानंतरही दोन स्थापना दिवस...

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्यांना पाडा, असे आवाहन केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत थेट उमेदवार देण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. मराठवाड्यात मराठाविरुद्ध ओबीसी, असा संघर्ष भडकला आहे. जरांगे यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप बीडमधील (Beed) लोकप्रतिनिधींकडून केले गेले. अशात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अंतरवालीत शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जरांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. Manoj Jarange is preparing for another agitation

ऊन-वारा-पावसापासून उपोषणस्थळी येणाऱ्यांचे संरक्षणासाठी मंडपावर टाकण्यासाठी पत्रे किंवा ते आणण्यासाठी दोनशे-तीनशे रुपये प्रत्येकाने जमा करावे. यावर 123 गावांनी प्रत्येकी एक पत्रा दिला तरी, आपली गरज पूर्ण होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची जबाबदारी काहीजणांवर सोपवण्यात आली. याशिवाय उपोषण लांबले तर, मला तुमच्या कोणाशी काही बोलता येणार नाही, तेव्हा गर्दी वाढली तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येकी वीस गावातून 'माधुकरी' गोळा करण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या. उपोषणस्थळी आणि राज्यात कुठेही समर्थ देणाऱ्या समाज बांधवांनी जातीयवादाला खतपाणी घालू नये, शांत राहावे, कुठल्याही प्रकारे आपल्या उपोषणाला गालबोट लागणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil News
Nashik Crime News: धक्कादायक, नाशिकमध्ये सुरू आहे बनावट नोटांची छपाई?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com