Chandrakant Khaire News : गणपती बाप्पांसमोर रंगले मानपान नाट्य, खैरे-भुमरेंमध्ये जुंपली

Manpan drama of political leaders staged in front of Ganapati Bappa : मंदिरात एकत्र आरती केल्यानंतर हे सगळे नेते बाहेर व्यासपीठावर विराजमान झाले. चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यक्रमाची सुत्रं हाती घेतली होती.
Chandrakant Khaire, Sandipan Bhumare
Chandrakant Khaire, Sandipan BhumareSarkarnama
Published on
Updated on

Shivsena V/S Shivsena UBT News : राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यापासून या पक्षाचे नेते ऐकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडत नाही. मग व्यासपीठ राजकीय असो, की धार्मिक कुरघोडीची संधी मिळाली की ती हेरली जातेच. असाच काहीसा प्रकार आज थेट गणपती बाप्पांसमोरच घडला. छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संस्थान गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते जमले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, (Chandrakant Khaire) भाजपचे राज्यसभेतील खासदार भागवत कराड, मंत्री अतुल सावे, जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असे सगळेच नेते बाप्पाच्या आरतीला जमले होते. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदीरासमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर संस्थानच्या वतीने नेत्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मंदिरात एकत्र आरती केल्यानंतर हे सगळे नेते बाहेर व्यासपीठावर विराजमान झाले. चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यक्रमाची सुत्रं हाती घेतली होती. नेत्यांच्या सत्काराला सुरवात झाली तेव्हा घोडेले यांनी सगळ्यात आधी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे याचे नाव सत्कारासाठी पुकारले. झालं खैरेंच्या शेजारी बसलेल्या खासदार संदीपान भुमरे यांचा इगो दुखवाला गेला.

Chandrakant Khaire, Sandipan Bhumare
Chandrakant khaire : पुतळा कोसळल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले, 'राज्यात...'

घोडेले यांना खडसावत त्यांनी प्रोटोकाॅलची आठवण करून दिली. व्यासपीठावर मंत्री असतांना खैरेंचा सत्कार आधी कसा? असा आक्षेप घेत देवाच्या दारात पक्षपात करता का? अशा शब्दात त्यांनी घोडेलेंचा समाचार घेतला. शेजारीच बसलेल्या खैरेंनी भुमरेंना (Sandipan Bhumre) रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आधीच पारा चढलेल्या खासदारांनी थेट ` तू बोलू नको` असा ऐकेरी उल्लेख करत खैरेंना शांत केले.

नेत्याचा असा अपमान झाल्यावर घोडेले तरी गप्प कसे बसतील? हा सरकारी कार्यक्रम नाही, गणेशोत्सवाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, म्हणून त्यांचे नाव आधी सत्कारासाठी घेतले, असे म्हणत भुमरेंवर पलटवार केला. व्यासपीठावरील तापलेले वातावरण पाहून काही सुज्ञ मंडळी धावली आणि त्यांनी भुमरेंना शांत करण्याचा प्रयत्न केला.

Chandrakant Khaire, Sandipan Bhumare
Sandipan Bhumre : संदिपान भूमरेंचं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज; म्हणाले, "तुम्ही फक्त उमेदवारी..."

यावर हे बरोबर नाही, असा पक्षपात चालणार नाही, असे म्हणत आवरते घेतले. त्यानंतर काहीशा गरमागरमीच्या वातावरणातच हा सत्कार समारंभ गुंडाळण्यात आला. पण खैरे-भुमरे-घोडेले यांच्यात व्यासपाठीवरच जाहीरपणे झालेल्या खडाजंगीने उपस्थितांचे मात्र चांगेलच मनोरंजन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com