Kailas Patil|शिंदे गटाकडून आजही अनेक ऑफर्स ; आमदार कैलास पाटलांचा गौप्यस्फोट

Shivsena| बंडखोर आमदार गुवाहाटीला जाताना कैलास पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते.
 Shivsena|
Shivsena|

उस्मानाबाद : शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यातील धुसफुस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडण्यासाठी शिंदे गटाकडून आजही आमदारांना वेगवेगळ्या माध्यामातून आमिषे देण्याचा प्रयत्न सुरुच आहे, असा गौप्यस्फोट उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी केला आहे.

तुळजापुरमध्ये आयोजित युवा सेनेच्या मेळाव्यात आमदार कैलास पाटील यांनी हा खळबळजनक शिंदे गटाकडून आजही अनेक ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केला. युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर हेदेखील यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यासाठी आजही शिंदे गटाकडून वेगवेगळी आमिषे, ऑफर दिल्या जात आहेत. इतकचं नाही तर कधी-कधी त्यासाठी दबावही टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण कितीही ऑफर आल्या, दबाव टाकला तरी आपण शिवसेना सोडणार नसल्याचे कैलास पाटील यांनी शिंदे गटाला खडसावून सांगितले आहे. तसेच, आजही इतर आमदारांच्यामार्फत निरोप येतात. पण सगळ्याच ऑफर्स जाहीरपणे सांगायचे नसतात, असे सांगत त्यांनी त्यांना येणाऱ्या ऑफर्स सांगणे मात्र टाळले आहे.

 Shivsena|
जमीन गैरव्यावहार; तहसीलदार सैंदाणे यांचे अधिकार काढले

विधानपरिषद निवडणूका झाल्या त्याच रात्री एकनाथ शिंदे २० हून अधिक आमदारांसह मुंबईतून बाहेर पडले. बंडखोर आमदार गुवाहाटीला जाताना कैलास पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते. पण शिंदे गटाचे बंड त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते रस्त्यातूनच पळून आले. एकनाथ शिंदेंनी आपल्याला फसवून नेल्याचे सांगत कैलास पाटील दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर दाखल झाले होते. समाज माध्यमांवरही त्यांच्या सुटकेचा थराराची घटना चर्चेत होती. त्याच कैलास पाटील यांनी आजही त्यांना शिंदे गटाकडून ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कैलास पाटील म्हणाले, शिवसेनेने उमेदवारीचे तिकीट दिले, शिवसेनेमुळेच आम्हाला समाजात ओळख दिली, आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो. शिवसेनेने ओळख दिली, ज्यांनी आम्हाला ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही. कितीही अमिषे आली तरी मी आणि खासदार ओमराजे हे शिवसेनेला सोडून जाणार नाही. बाकीचे नेते जरी सोडून गेले तरी, सामान्य जनता शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे आणि राहणार, असा विश्वास कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com