Maratha Aarakshan : आता तुमचं आमचं नातं नाय, आमच्या गावात यायचं नाय..!; मराठा आंदोलनाची धग वाढली

Maratha Reservation Latest News : मराठा आंदोलनाची धग वाढत चालली आहे. यामुळे राजकीय नेत्यांची कोंडी होत आहे.
Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest NewsSarkarnama

Dharashiv News : मराठा आरक्षण आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण मागे घेतले होते. उपोषण मागे घेतल्याच्या बरोबर एक महिन्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे विशाल सभा झाली. या सभेला राज्यभरातून मराठा समाजातील लाखो नागरिकांनी उपस्थिती लावली.

Maratha Reservation Protest News
Maratha Reservation : नारायण राणेंनंतर आता रामदास कदम यांचाही जरांगेंच्या मागणीला विरोध; म्हणाले...

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस वाढवून दिले आहेत. त्यानंतरही राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. आता काही गावांत मराठा समाजातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नेते, लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेनंतर वाढत चालली आहे. कधी काळी नेत्यांसाठी ' तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ हैं! अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आता नेत्यांनाच आता तुमचं आमचं नातं नाय ! आमच्या गावात यायचं नाय !!, असा इशारा देऊ लागले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींची कोंडी झाली आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आरक्षणामुळे गावोगावचे सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी वेगवेळ्या स्वरूपाची आंदोलने करणारे कार्यकर्ते आता थेट नेत्यांनाच गावबंदी करण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची गोची झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कात्राबाद (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील मराठा समाजातील तरुणांनी नेत्यांना गावबंदी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांचेच अनुकरण आता गावोगावी होताना दिसत आहे. उघड भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी शिस्तीत लाखोंचे मोर्चे काढले. जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा समाजातील एकजूट व आरक्षणाची मागणी वाढत चालली आहे. कोणत्याच पक्षाच्या नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत मराठा समाजातील युवक आज तरी नाहीत. तुमचं आमचं नातं नाय ! आमच्या गावात यायचं नाय !! असे ते म्हणू लागले आहेत. यापूर्वी ईट (ता. भूम) आणि अन्य काही गावांतील कार्यकर्त्यांनीही अशीच भूमिका घेत नेते आणि लोकप्रतिनिधींनी गावात प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे अनेक ठिकाणचे कार्यक्रम, दौरे रद्द करण्याची नामुष्की नेते, लोकप्रतिनिधींवर ओढवली होती.

Edited by : Sachin Fulpagare

Maratha Reservation Protest News
Manoj Jarange Rally Akluj : तुमची लोकसंख्या 4 वर्षांत 60 टक्के झाली कशी? ओबीसींच्या प्रमाणावर जरांगेंचा सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com