Manoj Jarange Rally Akluj : तुमची लोकसंख्या 4 वर्षांत 60 टक्के झाली कशी? ओबीसींच्या प्रमाणावर जरांगेंचा सवाल!

Manoj Jarange Rally Akluj : इंग्रजांनी केलेली १९३१ ची जनगणना उचलली...
Manoj Jarange Speech
Manoj Jarange Speech Sakarnama

Manoj Jarange Rally Akluj : अकलूजमध्ये जमलेल्या हजारोंच्या गर्दीपुढे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापवला. आरक्षणापासून जराही मागे न हटण्याची भूमिका मांडून जरांगे पाटलांनी सरकारच्या पोटात गोळाच आणला,पण जरांगे पाटलांनी एक वेळ मेलो तरी चालेल; पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत त्यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची पुन्हा एकदा आठवण करून दिली. तसेच, त्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या ओबीसी प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणावरही शका उपस्थित केली. (Latest Marathi News)

या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात कसल्या अडचणी येत आहेत म्हणून त्यांनी ओबीसींच्या लोकसंख्या प्रमाणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. "मंडल कमिशनला ओबीसीत कुणाकुणाचा समावेश करायचा त्यांची यादी सांगितली. ओबीसींची जनगणना करा, ज्या जातींना आरक्षण द्यायंच आहे, त्या मागास सिद्ध करा. पण मंडळ कमिशनने यातलं एकही काम केलं नाही. पूर्वीचीचा ओबीसींची यादी उचलली. इंग्रजांनी केलेली १९३१ ची जनगणना उचलली. व्ही.पी. सिंग सरकारसमोर आहवाल सादर केला. १९९० पासून ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिलं. १९९४ ला हे आरक्षण ३० टक्के झालं. तुमची लोकसंख्या ४ वर्षात ६० टक्के झालीच कशी?" असा सवालच जरांगेंनी उपस्थित

"तो एक नेता म्हणतो की, आमचा समाज ६० टक्के आहे. तुझ्या जातीचं माझ्या गावात एकही घर नाही. ओबीसीत येऊ नका, आत येऊ नका, आमच्या आरक्षणला धक्का लावू नका म्हणतोस, अरे किती खातो तू? एकटंच खातो का? एक गणित सांगतो ते मोजा, ६० टक्के ओबीसी, ३४ टक्के मराठा, एससी-एसटी १४ टक्के.. मारवाडी, ब्राह्मण, मुस्लिम बांधव यांना सोडायचं का? किती झालं? १५० टक्के आरक्षण असतं का? आम्हाला वेडे समजता का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com