Maratha Reservation : मराठा कुणबी आरक्षण समितीविरोधात संताप; अध्यक्षांना काळे झेंडे दाखवत आंदोलकांची घोषणाबाजी

Maratha Kranti Morcha Protest For Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यासोबतच राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनंही करण्यात येत आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservationsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Protest : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी नेते, लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदारांना गावबंदी करण्यात येत आहे. नेत्यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत. आता मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी मराठा कुणबी आरक्षण समितीच्या अध्यक्षांना काळे झेंडे दाखवले आहेत.

धाराशिवमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी मराठा कुणबी आरक्षण समितीच्या अध्यक्षांना काळे झेंडे दाखवले. समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले.

Maratha Reservation
Maratha Reservation : आत्मदहन करण्याचा तरुणाचा प्रयत्न, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

वेळकाढू समितीचा धिक्कार असो, गो बॅक, गो बॅक... अशा घोषणा या वेळी आंदोलकांनी दिल्या. पोलिसांनी आंदोलांना या वेळी ताब्यात घेतले. तेलंगणातील विधानसभा निवडणुकांमुळे राज्य सरकारने शिंदे समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हैदराबादमधून मूळ कागदपत्र मिळवण्यात विलंब होतोय. म्हणून ही मुदतवाढ देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. धाराशिवमध्ये शासकीय पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी मराठा कुणबी आरक्षण समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे हे आले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली- सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांची मतं जाणू घ्या. आणि विशेष अधिवेशन बोलवा. त्यात सविस्तर चर्चा करून दिल्लीला प्रस्ताव पाठवा. यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारला मुदत देण्यात आली होती. सरकारने ४० दिवसांची मुदत मागितली होती. सरकारकडे काहीतरी नियोजन असेल ना, पण या ४० दिवसांत या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने काहीच केलं नाही. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, राज्य सरकारने समितीला दिलेल्या मुदतवाढीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. तेलंगणा निवडणुकीचं कारण देत मराठा आरक्षण लांबणीवर टाकण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

Maratha Reservation
Manoj Jarange Patil PC : मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ अधिवेशन भरवा; जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com