Laxman Hake Car attack: अजितदादांच्या आमदार समर्थकांनी फोडली हाकेंची गाडी; गेवराईत रस्त्यावरच तुफान राडा

Laxman Hake News: गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडीत यांचे समर्थक आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे समर्थक भिडल्याचं दिसून आलं. यावेळी पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंच्या गाडीवर दगड आणि चप्पल फेकल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
Vijaysinh Pandit Vs Laxman Hake .jpg
Vijaysinh Pandit Vs Laxman Hake .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. एकीकडे मुंबईतील आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असतानाच बीडमधील (Beed) गेवराई तालुक्यात सोमवारी (ता.25)मराठा विरुद्ध ओबीसी वाट पेटल्याचं समोर आलं आहे.

गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडीत यांचे समर्थक आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे समर्थक भिडल्याचं दिसून आलं. यावेळी पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंच्या गाडीवर दगड आणि चप्पल फेकल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅनर लावण्यात आले होते. त्या वरून हा गोंधळ आहे. पंडित यांच्या समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) गाडीची पुढील काच फुटल्याचं दिसून येत आहे. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरु आहेत.

पोलिसांकडून गेवराईत सुरु असलेला हा राडा रोखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. आंदोलक हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर त्यांचे आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Vijaysinh Pandit Vs Laxman Hake .jpg
Sadabhau Khot Attack Pune: धक्कादायक! पुण्यात गोरक्षकांचा आमदार सदाभाऊ खोतांवर हल्ला? पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट

यावेळी हाके यांनी पंडित यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं. तर दुसरीकडे पंडित समर्थकांनी हाकेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हा वाद गेवराई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानं निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी पंडित यांच्या समर्थकांनी हाकेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तर यावेळी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाकेंवर शा‍ब्दिक हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, ‘लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र हा माणूस आहे. आमच्या मतदारसंघातील लोकांनी या हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. त्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला होता. त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालं आहे. हा स्ट्रीट डॉग असून रिचार्जवाला डॉग आहे. त्यामुळे आम्हाला सगळं माहीत हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे, ते आणि त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही केला.

Vijaysinh Pandit Vs Laxman Hake .jpg
Manoj Jarange Chitra Wagh Clash: मनोज जरांगेंनी चित्रा वाघांना झाप झाप झापलं; म्हणाले,'माझ्या नादी लागलीस,तर तुझं सगळं गबाळ...'

गेवराई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, माझे पुतळे काय जाळतो… मलाच जाळ असं थेट आव्हान लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलंय.

हाके म्हणाले, ‘कुणाच्याही दहशतीखाली राहणारे आम्ही नाही आहोत. गावगाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. बास झालं तुमचं शोषण, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहे. 500 किलोमीटर अंतरावरून तुझ्या गावात आलो आहे. 500 किलोमीटर अंतरावरून. दम असेल तर बाहेर ये’ असं खुलं आव्हान हाकेंनी आमदार पंडित यांना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com