Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडे मुश्रीफांनी मागितली परवानगी अन् मग घेतला 'हा' कार्यक्रम

Hasan Mushrif : मी बैठक घेऊ का ? अशी विचारणा खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना करण्याची वेळ आली.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: सार्वजनिक कामकाजावर बंदी घालावी, अशी मागणी मराठा समाजाकडून झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील त्याचा धसका घेतला. आज दसरा चौकातील मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेत त्यांनी दोन कार्यक्रमांची परवानगी मागितली.

जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या दिव्यांग आणि शाहू जन्मस्थळाबाबत होणाऱ्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असून, त्याबाबतची बैठक होणार आहे. आपली परवानगी मिळाल्यास मी ती बैठक घेऊ का ? अशी विचारणा खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना करण्याची वेळ आली.

Hasan Mushrif
Maratha Reservation News : मंत्री, आमदार, खासदारांच्या घर, कार्यालयावर पोलिसांचा खडा पहारा...

कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांची मंत्री मुश्रीफ यांनी भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. "मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवू", असेही ते म्हणाले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडू. सरकारने कायदेतज्ज्ञांचे सल्ले घ्यावेत व कोंडी फोडावी, ही मागणी करणार आहे".

"मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेतूनच गेल्या अनेक वर्षांपासून आजपर्यंत काम करीत आहे. यापुढेही या भूमिकेतूनच काम करू. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत लाखोंचे मोर्चे निघाले, त्यामध्ये सहभागी झालो. तसेच मराठा आरक्षणासाठीच्या उपोषण आणि आंदोलनामध्येही सहभागी झालो. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या मागणीवर आग्रही राहू", असेही मुश्रीफ म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Hasan Mushrif
Maratha Agitation : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका; जाणून घ्या, दिवसभरात काय जाळले अन् काय फोडले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com