Maratha Reservation News : पवारांचे शिलेदार जयसिंगराव म्हणतात, ऋषिकेश बेदरे हा वाघ...

Maharashtra News : मी गेवराईत गेलो तेव्हा तर त्याने माझी रस्त्यातच गळा भेट घेतली होती.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP Marathwada News : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, अंतरवाली सराटी येथे झालेला लाठीहल्ला आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या ऋषिकेश बेदरे प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. (Maratha Reservation News) विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करून आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. अशातच ऋषिकेश बेदरे यांच्या समर्थनात अनेक पक्ष, संघटना रस्त्यावर उतरताना दिसत आहेत.

Maratha Reservation News
MLA Rajesh Tope News : बेदरेने तो फोटो अंतरवालीत शरद पवारांच्या दौऱ्यात घुसून काढला असावा..

राष्ट्रवादीचे (NCP) (शरद पवार गट) मराठवाडा संपर्क प्रमुख माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी ऋषिकेश बेदरे हा मराठा आरक्षण लढ्यातील एक वाघ असल्याचे म्हणत त्याचे समर्थन केले आहे. (Marathwada) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या वाघांच्या समूहातला एक वाघ म्हणजे ऋषिकेश बेदरे होय.

बेदरे हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष असून, पक्षफुटीनंतर तो अजितदादा गटात आहे. ऋषिकेश बेदरे यांची पहिली प्राथमिकता ही मराठा समाज (वाडी ते गढी) ही होती आणि आहे. (Sharad Pawar) जो जो म्हणून मराठा समाजाच्या हिताचा, अस्मितेचा वा न्याय्य हक्काचा प्रश्न निर्माण होईल तिथे पद आणि पक्ष बाजूला ठेऊन मैदानात परिणामाची पर्वा न करता उतरणार म्हणजे उतरणारच अशी व्यक्ती म्हणजे ऋषिकेश बेदरे होय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब ज्या दिवशी अंतरवाली सराटीला मराठा आरक्षण आंदोलन अग्रणी मनोज जरांगे व लाठीमारातील जखमींना भेटावयास आले, त्यावेळी मीही त्यांच्या बरोबर होतो. गडबड करणाऱ्या आंदोलकांना त्याने पुढे होऊन थांबवले होते. साहेबांसोबत आम्ही समर्थ कारखान्यावर आलो तेव्हा तो साहेब, राजेश टोपे व आम्हा सर्वांना भेटला. त्याला मुळातच सर्व पक्षीय मराठा नेत्यांबद्दल नितांत आदर आहे. मी गेवराईत गेलो तेव्हा तर त्याने माझी रस्त्यातच गळा भेट घेतली होती, असेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

त्याचा राणे पुत्राबरोबरही फोटो आहेच की, कृपया राजकारण करू नका हा आरक्षणाचा विषय राजकारणाशी जोडू नका. आज हजारो तरुण मावळे सर्व पक्ष, संघटना बाजूला ठेऊन आरक्षण आंदोलन नेटाने चालवत आहेत. त्यांना जमेल तशी साथ द्या, नाही जमलं तर गप्प बसा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे. प्रथम समाज नंतर राजकारण हे मावळ्यांनी ठरवूनच आरक्षण आंदोलनात ते उतरले आहेत. ऋषिकेश बेदरे यांच्याबरोबर आमच्या सद्भावना कायम असून, मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com