Manoj Jarange hunger Strike : आरक्षणाच्या भूमिकेवर जरांगे ठाम ; थरथरत्या आवाजात म्हणाले, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही...

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा दुसरा टप्पा आहे.
Manoj Jarange hunger Strike :
Manoj Jarange hunger Strike : Sarka
Published on
Updated on

Jalna Political News : सरकारने मराठा आरक्षणाचा विचार करावा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ही भूमिका मला घ्यावी लागली. आता आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. संपूर्ण राज्याचे त्यांच्याकडे लक्ष लागले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला काहीही होणार नाही, तुम्ही फक्त शांततेत आंदोलने करा, असेही आवाहन जरांगे यांनी केले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी पाणी पिण्याचे आवाहन केले. मी त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. पण आज माझा नाईलाज आहे. मराठा समाजासाठी मला ही कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मला माफ करा मी अन्नपाणी घेऊ शकत नाही. कारण माझ्या मराठा समाजातील लेकरांच्या काय समस्या आहेत हे मला माहित आहे. सरकारने तातडीने यावर निर्णय घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन यावेळी जरांगेनी केले.

Manoj Jarange hunger Strike :
Fadnavis On Jarange Patil : जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

जरांगे म्हणाले, 'मराठा समाजाने खूप अन्याय सहन केलाय, मराठा जातीवर आजवर खूप अन्याय झाला आहे. आता तो होऊ द्यायचा नाही म्हणून ही लढाई आहे. माझ्या जातीवर अन्याय झालाय आता मी थांबणार नाही. प्रत्येकाचे आपल्या कुटूंबावर खूप प्रेम असते. पण आंदोलन करताना माझ्या कुटूंबियांना माझ्या समोर आणू नका, आंदोलन करताना मी कुटूंबाचा नाही, तर समाजाचा आहे. आंदोलन करताना कुटूंब समोर आले तर जीव कासावीस होतो,हुंदका दाटून येतो. माझ्या कुटूंबियानीही मी आंदोलन करताना माझ्यासमोर येऊ नये. मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा. अशी सादही त्यांनीघातली.

आपण क्षत्रिय आहोत.लढताना मरण आले तर मागे सरकारचे नाही, हा क्षत्रियाचा धर्म आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय तुमचा हा मुलगा मागे हटणार नाही, फक्त मराठा तरुणांनी आत्महत्या करु नयेत.आता दोनच पर्याय एकतर आरक्षण द्यायचे किंवा मराठ्यांनी आंदोलन करायचे. आरक्षण मिळणार आहे, ते शेवटच्या टप्प्यात आहे, पण आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्यात्यांच्यातच भांडणे सुरू आहेत, असा टोलाही जरांगेंनी यावेळी लगावला.

Edited By- Anuradha Dhawade

Manoj Jarange hunger Strike :
NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com