Jalna Aantarwali Sarati: तुम्ही जर पाणी पिण्याचा हट्ट करत राहिले, तर आपल्या समाजाचे कसे होणार, आपल्या लेकराबाळांनी खूप अन्याय सहन केलाय. सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, मला वाटतं जाणीवपूर्वक आपल्या मराठा लोकांवर अन्याय केला जात आहे. मला आपल्या लेकरांना न्याय देण्याची एवढीच संधी आहे, अशी भावना व्यक्त करताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला आहे. पण तो किती वेळ द्यायचा, असाही सवाल या वेळी जरांगेंनी उपस्थित केला.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी अन्न-पाण्याचाही त्याग केला आहे. डॉक्टरांचे उपचारही त्यांनी नाकारल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अशातच राज्यभरातून उपोषणस्थळी जमलेल्या मराठा बांधवांनी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह धरला. या वेळी उपस्थितांशी बोलताना जरांगे अत्यंत भावनिक झाले होते.
जरांगे म्हणाले, 'आपल्या कोट्यवधी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षण देण्यासाठी एखाद्या जिवाचे काही बरे वाईट झाले तरी चालेल, पण सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, या भावनेतून मी हे उपोषण करत आहे. आपल्या समाजाला न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे. मला तुमची माया कळते, पण तुम्ही असा हट्ट धरला, रडायला लागले आणि पाणी पिण्यासाठी हट्ट धरू लागले तर आपल्या लेकरांना न्याय कसा मिळणार, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला.
मी समाजाचा शब्द कधीही डावलला नाही, असे बोलत असतानाच पुन्हा एकदा जमलेल्या लोकांनी जरांगेंना समाजासाठी आज तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, समजातील माता-भगिनी तुमच्यासाठी इथे आल्या असतील तर तुम्हाला पाणी प्यावेच लागेल, अशी आग्रही मागणी केली. समाजाच्या आग्रहानंतर मनोज जरांगेंनी अखेर पाणी पिण्याचा निर्णय घेतला.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.