Maratha Reservation : शुक्रवारी रात्रीच जरांगे-पाटलांनी डाव जिंकला..!

Manoj Jarange Patil : रात्रीच्या पाच तासांत असं काय घडलं, की जरांगे-पाटलांचा विजय झाला
MangalPrabhat Lodha, Jarage Patil Deepak Kesarkar
MangalPrabhat Lodha, Jarage Patil Deepak KesarkarSarkarnama

Maratha Aarakshan Navi Mumbai News :

आज (शनिवारी) पहाटे मोठी घडामोड घडली आणि मराठा समाजानं गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. काल (26 जानेवारी) दुपारी पावणेचार वाजता मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला शनिवारी दुपारी 12 वाजताची डेडलाईन दिली होती. त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या, की अवघ्या पाच तासांत सरकारनं अधिसूचना काढला आणि मराठा समाजाचं समाधान झालं.

MangalPrabhat Lodha, Jarage Patil Deepak Kesarkar
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाची पहिली लढाई तर जिंकली; पण आव्हानं कायम..!

मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) योद्धे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल (शुक्रवारी) नवी मुंबईतील वाशीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत सरकारला शेवटचा इशारा दिला होता. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देताना 'सगेसोयरे' या शब्दाचा समावेश व्हावा, ही त्यांची मुख्य मागणी होती. यावरून गेले काही दिवस बराच खल सुरू होता आणि हे अशक्य असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं. मात्र, जरांगे-पाटील त्यावर अडून होते. अखेर सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या. हे सर्व रात्रीच्या पाच तासांत घडलं. (Maratha Aarakshan)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रात्रीत काय काय घडलं पाहूया...

शुक्रवारी रात्री 10 वाजता

राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर अधिसूचना घेऊन ते 'वर्षा'वरून निघाले.

शुक्रवारी रात्री 11.15 वाजता

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी नवी मुंबईतील वाशीत दाखल झालं.

शुक्रवारी रात्री 11.20 वाजता

सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात चर्चेला सुरुवात. ही चर्चा 20 मिनिटे चालली.

शुक्रवारी रात्री 11.48 वाजता

नवी मुंबईच्या पोलिस उपायुक्तांची जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा

शनिवारी पहाटे 1.30 वाजता

मुंबईचे शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) जरांगे-पाटील यांच्याशी चर्चेसाठी वाशीत दाखल. जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटीमधून पदयात्रा निघाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना दोन मंत्री भेटले.

दोन तास चर्चा

मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात दोन तास चर्चा झाली. सगेसोयरे या शब्दावर पुन्हा खल झाला. त्यानंतर मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर चर्चा झाली. जरांगे-पाटील यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले.

शनिवारी पहाटे 2.45 वाजता

मनोज जरांगे-पाटील आणि दोन्ही पालकमंत्र्यांची व मंत्र्यांची पत्रकारपरिषद झाली आणि आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. त्याचवेळी या आरक्षणाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानात आलोच म्हणून समजा, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

शनिवारी सकाळी 9.30 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जरांगे-पाटील यांची वाशीत भेट घेऊन त्यांच्याकडे अधिसूचनेची प्रत सुपूर्द केली. तत्पूर्वी जरांगे-पाटील यांना ज्यूस पाजला आणि दोघांनी हातात तलवारी घेऊन जयजयकार केला.

R...

MangalPrabhat Lodha, Jarage Patil Deepak Kesarkar
Gunaratna Sadavarte Challenge Manoj Jarange : मनोज जरांगेंना गुणरत्न सदावर्तेंचे चॅलेंज, अध्यादेशाने हुरळून जावू नका...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com