Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation News
Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation NewsSarkarnama

Maratha Reservation News : आरक्षणावर तोडगा निघणार ? बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून जरांगेना निमंत्रण ; कुणबी दाखला मिळणार ?

Jalna Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची शक्यता आहे.
Published on

Mumbai : मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं आहे. जालन्यात उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळी येत आहेत. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे. बैठकीत आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगेंनाही या बैठकीस बोलविण्यात आले आहे.

दुपारी बारा वाजता ही बैठक होत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आजच घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation News
Jalna Maratha Andolan : जालन्यात एसटीच्या सर्व फेऱ्या थांबवल्या ; एसटी महामंडळाचा निर्णय ; प्रवाशांची गैरसोय..

उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमद नगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीतील निर्णयाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Cm Eknath Shinde -Fadanvis Maratha Reservation News
Manoj Jarange News : उपोषणकर्ते मनोज जरांगेंचा मोठा निर्णय ; आजपासून अन्नपाणी त्याग आंदोलन, ‎राज ठाकरे घेणार भेट

उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. जरांगे पाटलांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आजपासून त्यांनी अन्नपाणी त्याग आंदोलनास सुरवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com