Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबीयाला प्रत्येकी दहा लाखाची मदत! चार कोटी आले

protestors who sacrificed their lives will receive ₹10 lakh each. : बीड- 2 कोटी 70 लाख, छत्रपती संभाजीनगर-70 लाख आणि धाराशीव-50 लाख असे एकूण 3 कोटी 90 लाख रुपयांचा निधी देखील वर्ग करण्यात आला आहे.
Maratha Reservation Manoj Jarange Patil
Maratha Reservation Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात तीव्र आंदोलनं झाली. विशेषत: मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आरक्षणाची मागणी करत टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व एका सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.

याआधी सरकारने मदत देण्याची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात ती करण्यात आली नव्हती. दरम्यान हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करण्यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा व राज्यभरातून लाखो समाज बांधव मुंबईत दाखल झाले होते. अखेर या आंदोलनापुढे सरकारने नमते घेत मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत यासंदर्भात अध्यादेश काढला.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मंत्र्यांनी आझाद मैदानावर जाऊन अध्यादेशाची प्रत मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवली होती. यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत आणि शासकीय नोकरीमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पैकी आर्थिक मदतीची अंमलबजावणी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. पाच सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेश प्राप्त झाले.

Maratha Reservation Manoj Jarange Patil
Maratha Reservaiton News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण थेट जरांगेंच्या भेटीला..

यासाठी बीड- 2 कोटी 70 लाख, छत्रपती संभाजीनगर-70 लाख आणि धाराशीव-50 लाख असे एकूण 3 कोटी 90 लाख रुपयांचा निधी देखील वर्ग करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्ष अधिकारी तथा सह कक्षप्रमुख शरद घावटे यांनी या संदर्भातील पत्र तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून सुरू झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पाच, बीड जिल्ह्यातील 27आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात मयत आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा सहाय्यता निधी संबंधितांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Maratha Reservation Manoj Jarange Patil
Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटच्या GR शिवाय CM फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत काय केले?

बीड जिल्ह्यातील मयत व्यक्तींची नावे

  1. धीरज संजय मस्के, राहणार गवळीवाडी, तालुका जिल्हा बीड

  2. आदिनाथ गोवर्धन मस्के, राहणार बाहेगवान, तालुका वडवणी, जिल्हा बीड

  3. कृष्णा बालासाहेब तातोडे, राहणार नित्रुड तालुका माजलगाव जिल्हा बीड

  4. सुहास कल्याण शिंदे राहणार वरवटी तालुका जिल्हा बीड

  5. प्रवीण दिलीप सोनवणे राहणार शेरी बु तालुका आष्टी जिल्हा बीड

  6. महादेव आसाराम पवार राहणार राक्षस भुवन तालुका जिल्हा बीड

  7. आबासाहेब बालासाहेब शिंदे राहणार माटेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड

  8. प्रवीण उर्फ शैलेश बळीराम सुळे राहणार लखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड

  9. अंगत मदन लोणकर राहणार लोणी शहाजानपूर तालुका जिल्हा बीड

  10. भरत राम इंदूरे राहणार शहाजानपूर दगडी तालुका जिल्हा बीड

  11. दत्ता कालिदास महिपाल राहणार शिंदेवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड

  12. स्वानंद हनुमान म्हस्के राहणार पालवन तालुका जिल्हा बीड

  13. महेश पांडुरंग शेळके राहणार जुजगव्हाण तालुका जिल्हा बीड

  14. भागवत नरहरी गायके राहणार सौंदाना तालुका जिल्हा बीड

  15. कल्याण संदिपान मते राहणार लोणी शहाजानपूर तालुका जिल्हा बीड

  16. अरुण राजेंद्र सुरवसे राहणार आहेर चिंचोली तालुका जिल्हा बीड

  17. भारत त्रिंबक रसाळ राहणार मांजरसुंबा तालुका जिल्हा बीड

  18. लक्ष्मण लिंबा मोरे राहणार चांदणी तालुका जिल्हा बीड

  19. बापूराव दगडू कवडे राहणार खापरपांगरी तालुका जिल्हा बीड

  20. अर्जुन अंबादास कवठेकर राहणार नायगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड

  21. सुनील बाबासाहेब वाकुरे राहणार पालवन तालुका जिल्हा बीड

  22. अभिषेक बाळू इंगोले राहणार आहेर धानोरा तालुका जिल्हा बीड

  23. प्रवीण गोरख पिंगळे राहणार शिरपूर धुमाळ तालुका शिरूर कासार जिल्हा बीड

  24. अतुल अशोक राहणार परभणी केसापुरी तालुका जिल्हा बीड

  25. गणेश उत्तम शेंबडे राहणार शेकटा तालुका गेवराई जिल्हा बीड

  26. बापूसाहेब कल्याण काळे राहणार लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड

  27. हनुमंत शिवाजी शिंदे राहणार नागझरी तालुका गेवराई जिल्हा बीड

Maratha Reservation Manoj Jarange Patil
Beed ZP News : बीड जिल्हा परिषदेची प्रभाग रचना जाहीर, केजमध्ये एक गट दोन गण वाढले!

छत्रपती संभाजीनगर

1.बाबासाहेब जनार्दन पडूळ राहणार लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर

2. समाधान देवबा पवार राहणार जातवा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर

3. कृष्णा धनाजी व्यवहारे राहणार पेडगाव आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर

4. कैलास छगन लहाने राहणार वाकोद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नगर

5. गणेश भिकनराव शिंदे राहणार पिसादेवी रोड भक्ती नगर छत्रपती संभाजी नगर

6. रवींद्र बाबुराव जाधव राहणार पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नगर

7. समाधान रायभान काळे राहणार खुट्टा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मनोज जरांगेंची मान्य झालेली मागणी पूर्णत्वाकडे : CM फडणवीसांचे गृह खात्याला 15 दिवसात कार्यवाही करण्याचे आदेश

धाराशिव जिल्हा

1.बालाजी मधुकर भोसले राहणार येडशी तालुका जिल्हा धाराशिव

2. प्रतीक रणजीत सावंत राहणार हळगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव

3. योगेश संजय जाधव राहणार देवसिंगा तूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव

4. संजय देविदास मोरे राहणार तलमोड तालुका उमरगा जिल्हा धाराशिव

5. शिवाजी विठ्ठल निलंगे राहणार पाटोदा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com