
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मराठा समाजासाठीच्या मागण्या मान्य करवून घेतल्या. आता यातील बहुतांश मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत शासन निर्णय यापूर्वीच जारी झाला होता. आता अन्य दोन मागण्याही पूर्णत्वाकडे गेल्या आहेत.
यात मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी धाराशीव, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 4 कोटी मिळाले आहेत. शिवाय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासही सुरूवात झाली आहे. 471 प्रकरणे पंधरा दिवसांत मागे घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला दिले आहेत.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 2016 पासून आंदोलन, मोर्चे मोठ्या प्रमाणात निघत आहेत. यात काही वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हेही आरक्षणासाठी लढत आहेत. या संपूर्ण लढ्यादरम्यान, 2016 पासून आजवर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 852 गुन्हे नोंदवले गेले होते. यात मार्च 2025 पर्यंत दाखल गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर अन्य 471 प्रकरणे प्रलंबित असून उर्वरित प्रकरणे मागे घेण्याची प्रक्रिया न्यायालयीन स्तरावर आहे.
आता राज्य सरकारने आता मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. त्यानुसार 471 प्रकरणे येत्या 15 दिवसांत मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश गृह विभागाने जिल्हा पातळी- वरील समित्यांना दिले आहेत. यात जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान 9 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत.
मदतही दिली जाणार :
मराठा आंदोलनादरम्यान आत्महत्या आणि नैसर्गिक कारणांमुळे 254 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 96 आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत आणि पात्र नातेवाईकांना नोकरी देण्यात येणार आहे. यातील उर्वरीत मदतीसाठी धाराशीव, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 4 कोटी मिळाले आहेत. शिवाय आतापर्यंत 36 जणांना नोकऱ्या मिळाल्या असून 9 प्रकरणे प्रलंबित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.