Maratha Reservation News : कुणबी नोंदी कमी सापडलेल्या परभणीत फेरतपासणी..

Kunbi Caste Certificate : परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीचे कामे व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
Maratha Reservation News :
Maratha Reservation News :Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : मराठवाड्यात कुणबी नोंदी कमी सापडल्यामुळे इथे फेरतपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त मुधकरराजे आर्दड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. राज्यात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदीच्या आधारे त्या सगळ्यांना प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच मराठवाड्यात कुणबी नोंदी अत्यंत कमी प्रमाणात आढळल्यामुळे पुन्हा पथक पाठवून नोंदी शोधण्याचा वेग वाढवावा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात केली होती.

त्यानुसार आता विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कुणबींच्या कमी नोंदी सापडल्या आहेत, तिथे फेरतपासणी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. पैकी परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी फेरतपासणी करण्यात येणार आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शासनाने न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे समिती स्थापन केली आहे. सदर समिती ही प्रत्येक जिल्ह्यात सापडलेल्या नोंदीचा वेळोवेळी आढावा घेत आहे.

Maratha Reservation News :
Daos Tour : मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा; कोट्यवधींची ‘ट्रिप’, लाखोंसाठी ‘होप’

परभणी जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी कमी असून, सर्व संबंधित विभागांनी पुन्हा काळजीपूर्वक नोंदीची फेरतपासणी करुन अहवाल सादर करण्याचेही विभागीय आयुक्त आर्दड यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र विषयक आढावा बैठक झाली. परभणी जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याकरीता कुणबी जातीच्या नोंदीची कागदपत्रे आवश्यक आहे. (Maratha Reservation)

परंतु, परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीचे कामे व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आतापर्यंत ज्या सापडलेल्या कुणबी नोंदी आहेत त्या अत्यंत कमी आहे. याकरीता जिल्हा विभाजनामुळे परभणी जिल्ह्यातील जे तालूके हिंगोली किंवा जालना जिल्ह्यात समाविष्ठ झाली आहेत त्याठिकाणची 1967 पुर्वीची सर्व कागदपत्रे तपासावीत. परभणी, सेलु जिंतूर, गंगाखेड, पुर्णा, पालम, पाथरी, मानवत आणि सोपपेठ या 9 तालूक्यात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यात परभणी(Parbhani) तालुक्यात 206, सेलू 361, जिंतुर 598, गंगाखेड 56, पुर्णा 176, पालम 181, पाथरी 608, मानवत 586 तर सोनपेठ तालूक्यात 116 अशा एकूण या 9 तालूक्यात 2 हजार 288 नोंदी आढळून आल्या आहेत. परंतू जिल्ह्यात यापेक्षा ही जास्त नोंदी असण्याची शक्यता आहे. याकरीता नोंदीची फेरतपासणी करावी. प्रत्येक संबंधीत विभागाने त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नोंदीचे प्रत्येक पान पुन्हा काळजीपूर्वक तपासावे. तसेच संबंधीतांनी 100 टक्के नोंदीची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावीत, अशा सुचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.

या कामात दिरंगाई किंवा दुर्लक्ष केल्यास किंवा शोधणार नसाल तर विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक पाठवून तपासणी केली जाईल. आणि त्यानंतर ही त्यात नोंदी आढळल्यास संबंधितास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशाराही आर्दड यांनी बैढकीत दिला. याच बैठकीत आर्दड यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना मराठा (Maratha) कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले.

(Edited By Deepak Kulkarni)

Maratha Reservation News :
Loksabha Election : ठाकरे गट मावळ लोकसभेचे रणशिंग फुंकणार; आदित्य ठाकरे पिंपरीत जाहीर सभा घेणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com