Maratha Reservation : मराठा समाजासाठी खुशखबर; कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा आदेश...

Maharashtra State Government : 54 लाख मराठा लोकांना फायदा होण्याची शक्यता...
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू झालेले मराठा समाजाचे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले आहेत. आतापर्यंत मराठा समाजातील ज्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सुमारे ५४ लाख मराठा लोकांना कुणबी दाखले मिळणार आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. ते 20 जानेवारीला अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान, जरांगेंनी आंदोलकांसह मुंबईत येऊ नये, म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र जरांगे आपल्या निर्णयावर ठाम असून सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले तर सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तत्काळ कुणबी दाखले द्या, देण्याचे आदेश काढले आहेत.

Maratha Reservation
Nana Patole : पुणे काँग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी नाना पटोले सरसावले; घेतला मोठा निर्णय...

राज्यात 54 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असून त्यांना तातडीने मोठ्या प्रमाणात देण्यात यावेत. त्यासाठी राज्यभरात शिबिर भरवून ही कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. आंदोलनाला (Maratha Reservation) दोन दिवस बाकी असताना दिलेल्या या सूचनांमुळे राज्यात आता कुणबी प्रमाणपत्रवाटपाच्या कामाला वेग येणार आहे. दरम्यान, सरकारला दीड महिन्यांचा कालावधी दिला होता. आता दोन दिवसांत किती जणांना प्रमाणपत्र देणार, असा प्रश्न आंदोलक मनोज जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे आदेश...

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. यासाठी समितीने निजामकालीन पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी केली. आता संबंधित मराठा लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करावे. पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरांचे आयोजन करून ही कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Maratha Reservation
Sudhakar Shrangare : खासदार सुधाकर शृंगारेंची उमेदवारी धोक्यात; लातूरमध्ये भाजपचं गणित काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com