Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा समाजाचे सर्वेक्षण 'या' तारखेपासून होणार सुरू

Maratha Reservation : सर्वेक्षणासाठी बनवण्यात आले नवीन सॉफ्टवेअर...
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी केली आहे. या मोहिमेत एकही कुटुंब वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यभर मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू करणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आगामी काळात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार

या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. ते तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरबाबतचे ज्ञान संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोगाकडून निश्चित करण्यात आला आहे.

त्यानुसार 20 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक दि. 21 व 22 जानेवारी 2024 ला संबंधित तालुक्याच्या / वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील / वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Maratha Reservation : भले शाब्बास, दिवंगत कर्मचाऱ्यांनाही लावली ड्युटी...

31 जानेवारीला सर्वेक्षण पूर्ण होणार

त्यानंतर मुख्य सर्वेक्षणाच्या कामाला 23 जानेवारी 2024 पासून सुरुवात करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फत ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी पुणे पालिकेची हजारांची फौज

राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यभर मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. यासाठी मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुणे शहरातील सर्वेक्षणासाठी महापालिकेने उपायुक्त चेतना केरुरे यांची नियुक्ती सहायक नोडल अधिकारी म्हणून केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 1 हजार 70 कर्मचारी काम करीत आहेत.

Edited By : Rashmi Mane

R...

Maratha Reservation
Maratha Reservation News : काय सांगता? भुजबळांचे खंदे समर्थक मनोज जरांगेंसाठी सरसावले; घरोघरी जाऊन...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com